India football team: भारतीय फुटबॉल संघ चीनमध्ये खेळणार! एशियन गेम्समधील सहभागावर शिक्कामोर्तब

भारतीय फुटबॉल संघांसाठी 9 वर्षांनंतर एशियन गेम्सचे दार उघडण्यात आले आहे.
Indian Football Team
Indian Football TeamDainik Gomantak
Published on
Updated on

India Men’s and Women’s football teams will participate in Asian Games 2023: चीनमध्ये यंदा 19 वी एशियन गेम्स स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेसाठी खेळाडूंची तयारी सुरू झाली आहे. त्यातच आता भारतीय फुटबॉल चाहत्यांसाठी आणि खेळाडूंसाठी आनंदाची बातमी आली आहे. भारतीय पुरुष आणि महिला संघाला एशियन गेम्समधील सहभागासाठी परवानगी मिळाली आहे.

भारताच्या क्रीडा आणि युवा कल्याण मंत्रालयाने नियमांमध्ये सुट दिल्याने भारतीय फुटबॉल संघांच्या एशियन गेम्समधील सहभागाचा मार्ग मोकळा झाला आहे. याबद्दल केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे.

अनुराग ठाकूर यांनी ट्वीट केले आहे की 'भारत सरकारच्या क्रीडा आणि युवा कल्याण मंत्रालयाने लागू असलेल्या निकषांनुसार पात्र नसलेल्या दोन्ही फुटबॉल संघांच्या सहभागासाठी नियम शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे.'

'नजीकच्या काळातील कामगिरी लक्षात घेता मंत्रालयाने सुट देण्याचा निर्णय घेतला. मला खात्री आहे की एशियन गेम्समध्ये हे संघ त्यांचे सर्वोत्तम आणि देशाला अभिमान वाटेल, अशी कामगिरी नोंदवतील.'

Indian Football Team
Sunil Chhetri: सुनील छेत्री म्हणतोय, '...तेव्हा मेस्सी अन् रोनाल्डोलाही हरवेल'

क्रीडा खात्याच्या नियमानुसार जर आशिया खंडातील क्रमवारीमध्ये पहिल्या 8 संघात स्थान असेल, तरच फुटबॉल संघ एशियन गेम्ससाठी पाठवला जातो. त्याचमुळे भारतीय ऑलिम्पिक संघटनेने फुटबॉल संघाला एशियन गेम्ससाठी भारताच्या महिला आणि पुरुष संघांना एशियन गेम्समधील सहभागासाठी नकार दिलेला होता.

पण अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने आणि भारतीय पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक इगॉर स्टिमॅक यांनी एशियन गेम्समधील सहभागासाठी परवानगी द्यावी अशी विनंती केली होती. अखेर फुटबॉलच्या दोन्ही संघांना एशियन गेम्समधील सहभागासाठी ग्रीन सिग्नल मिळाला. त्यामुळे ९ वर्षांनंतर हे दोन्ही संघ एशियन गेम्समध्ये खेळताना दिसतील.

सध्या भारतीय पुरुष संघाची आशिया खंडातील क्रमवारी 18 आहे, तर महिला संघाची क्रमवारी 11 आहे. पण भारतीय संघाने गेल्या काही महिन्यांत चांगली कामगिरी केली आहे. भारतीय पुरुष संघाने नुकतीच SAFF चॅम्पियनशीप स्पर्धाही जिंकली होती.

Indian Football Team
India Football Team: छेत्रीच्या टीम इंडियाला मिळणार 'एवढ्या' कोटीचे बक्षीस, ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा

दरम्यान, एशियन गेम्समधील सहभागाची परवानगी मिळाल्याने स्टिमॅक यांनी आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले, 'भारतीय फुटबॉलसाठी हा खुपच आनंदाचा दिवस आहे. आपल्या सरकारचा आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांना हा अतिशय उत्साहवर्धक निर्णय आहे. एशियन गेम्समधील सर्वोत्तम संघांना आव्हान देण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांचे खूप आभार.'

'मी आमचे अध्यक्ष कल्याण चौबे, सचिव डॉ. शाजी प्रभकरन आणि बाकी सर्वांचे याबद्दल आभार मानतो.'

भारतीय संघाने यापूर्वी एशियन गेम्समध्ये चांगली कामगिरी केली आहे. साल 1951 मध्ये भारतीय पुरुष फुटबॉल संघाने भारतात झालेल्या एशियन गेम्समध्ये सुवर्णपदकाची कमाई केली होती. तसेच 1962 मध्येही पुरुष संघाला सुवर्णपदक मिळाले होते. याशिवाय 1970 साली पुरुष संघाने कांस्य पदक जिंकले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com