VIDEO: धुरंधरमध्ये 'पाकिस्तानी गाणं'! सिंगर हसननं केला मोठा खुलासा; निर्मात्यांनी 55 लाख दिल्याचा केला दावा

Hawa Hawa Song Dhurandhar Moive: जहांगीर यांनी अलीकडेच एका पाकिस्तानी टीव्ही शोमध्ये बोलताना दावा केला की, 'धुरंधर'च्या निर्मात्यांनी 'हवा हवा' गाण्याच्या वापरासाठी त्यांना 50 हजार डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात सुमारे 45 लाख रुपये दिले आहेत.
Hawa Hawa Song Dhurandhar Moive
pakistani singer hassan jahangir Dainik Gomantak
Published on
Updated on

Hawa Hawa Song Dhurandhar Moive: प्रसिद्ध दिग्दर्शक आदित्य धरच्या 'धुरंधर' या चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिसवरच नाही, तर आपल्या संगीतानेही प्रेक्षकांना वेड लावले. या चित्रपटात जुन्या गाण्यांचा अतिशय खुबीने वापर करण्यात आला, ज्यामध्ये संजय दत्तच्या एन्ट्रीसाठी वापरलेले 'हवा हवा' हे गाणे विशेष लोकप्रिय ठरले. आता याच गाण्यावरुन पाकिस्तानी गायक हसन जहांगीर यांनी एक मोठा खुलासा केला असून भारतीय चित्रपट निर्मात्यांनी या गाण्याचे राईट्स रीतसर विकत घेतल्याचे त्यांनी सांगितले.

जहांगीर यांनी अलीकडेच एका पाकिस्तानी टीव्ही शोमध्ये बोलताना दावा केला की, 'धुरंधर'च्या निर्मात्यांनी 'हवा हवा' गाण्याच्या वापरासाठी त्यांना 50 हजार डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात सुमारे 45 लाख रुपये दिले आहेत. हसन जहांगीर यांनी 'शान-ए-सहूर' या कार्यक्रमात सहभागी झाले असताना आपल्या कारकिर्दीतील या सर्वात गाजलेल्या गाण्याबद्दल आठवणींना उजाळा दिला. त्यांनी चित्रपटाचे थेट नाव न घेता असे सूचित केले की, अलीकडेच एका 300 कोटींच्या बजेट असलेल्या चित्रपटात त्यांच्या गाण्याचा वापर झाला, ज्या चित्रपटाने जागतिक स्तरावर 1100 कोटींहून अधिक कमाई केली. त्यांच्या या विधानावरुन होस्ट निदा यासिर यांनी 'धुरंधर'चा उल्लेख केला आणि निर्मात्यांनी रीतसर परवानगी घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

Hawa Hawa Song Dhurandhar Moive
Dhurandhar 2: बॉक्स ऑफिसचा नवा सुलतान! रिलीजआधीच 'धुरंधर 2' ची 119 कोटींची कमाई; 'जवान' अन् 'RRR' ला सोडले मागे VIDEO

गायक हसन जहांगीर पुढे म्हणाले की, "निर्मात्यांनी गाणे वापरण्याची केवळ परवानगीच घेतली नाही, तर त्यासाठी योग्य मोबदलाही पाठवला. पूर्वी कॉपीराइटची पद्धत इतकी कडक नव्हती, मात्र आता जे कोणी माझे गाणे वापरतात, ते आधी संपर्क साधतात आणि मानधनही देतात." 'हवा हवा' या गाण्याचा इतिहास सांगताना त्यांनी नमूद केले की, हे गाणे साधारण 40 वर्षांपूर्वीचे आहे.

1986 मध्ये त्यांनी हे गाणे रेकॉर्ड केले होते आणि 1987 मध्ये ते प्रदर्शित झाले होते. इतक्या दशकांनंतरही या गाण्याची जादू कायम असून बॉलिवूडच्या (Bollywood) मोठ्या चित्रपटांमध्ये त्याचा वापर होणे, हे या गाण्याच्या लोकप्रियतेचे प्रतीक आहे. त्यांनी हेदेखील स्पष्ट केले की, केवळ 'पाकिस्तान आयडॉल'ला त्यांनी विनामूल्य गाण्याचे हक्क दिले आहेत, बाकी व्यावसायिक वापरासाठी ते रीतसर शुल्क घेतात.

Hawa Hawa Song Dhurandhar Moive
Dhurandhar 2: "यासाठी धुरंधरमधला रोल सोडला"! प्रसिद्ध अभिनेत्याने केला खुलासा; बॉलिवूडमध्ये रंगली जोरदार चर्चा

एकीकडे पहिल्या भागातील गाण्यांची चर्चा सुरु असतानाच, दुसरीकडे प्रेक्षक आता 'धुरंधर 2' च्या प्रदर्शनासाठी सज्ज झाले आहेत. रणवीर सिंहच्या (Ranveer Singh) मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल आणि सारा अर्जुन यांसारखे दिग्गज कलाकार पाहायला मिळणार आहेत. पहिल्या भागाच्या अफाट यशानंतर आणि 'हवा हवा' सारख्या गाण्यांनी निर्माण केलेल्या क्रेझमुळे सिक्वेलकडूनही चाहत्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. हा चित्रपट 19 मार्च रोजी मोठ्या पडद्यावर धडकणार असून त्यापूर्वी अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येही चित्रपटाने अनेक विक्रम मोडीत काढले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com