Rohit Sharma gave update on Jasprit Bumrah recovery and Comeback:
भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. दरम्यान, या दौऱ्यासाठीही वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह भारतीय संघाचा भाग नाही. बुमराह गेल्या 10 महिन्यांपासून भारतीय क्रिकेटपासून दूर आहे. पण तो आता भारतीय क्रिकेट संघात कधी पुनरागमन करणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याबद्दल आता भारताचा कर्णधार रोहित शर्माने प्रतिक्रिया दिली आहे.
जसप्रीत बुमराहला पाठीची दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्याला एप्रिल 2023 मध्ये शस्त्रक्रियाही करून घ्यावी लागली. याच दुखापतीमुळे तो सप्टेंबर 2022 पासून भारतीय संघातून बाहेर आहे.
दरम्यान, वेस्ट इंडिजविरुद्ध 27 जुलैपासून सुरू होणाऱ्या वनडे मालिकेपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये रोहितने बुमराहबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
तसेच वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर भारतीय संघ 3 टी20 सामन्यांच्या मालिकेसाठी आयर्लंड दौऱ्यावरही जाणार आहे. या दौऱ्यात बुमराह पुनरागमन करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण याबद्दल अद्याप काही माहिती नसल्याचे रोहितने स्पष्ट केले.
रोहित म्हणाला, 'तो संघात जो अनुभव घेऊन येतो, तो खूप महत्त्वाचा आहे. पण तो मोठ्या दुखापतीनंतर संघात पुनरागमन करणार आहे. पण, मला माहित नाही की तो आयर्लंडला जाणार आहे की नाही. कारण अद्याप आयर्लंड दौऱ्यासाठी संघाची निवड झालेली नाही. जर त्याला सामने खेळण्याची संधी मिळाली, तर ते चांगलेच असेल.'
वर्ल्डकपपूर्वी आम्ही त्याला अधिकाधिक सामने खेळवण्याचा प्रयत्न करू. कारण जेव्हा तुम्ही अशा मोठ्या दुखापतीनंतर पुनरागमन करता, तेव्हा तुमचा फिटनेस तितका चांगला नसतो. त्यामुळे माझ्यामते तो जेवढे सामने अधिक खेळेल, तेवढे त्याच्यासाठी आणि संघासाठी चांगले असणार आहे.'
'आम्ही याकडे लक्ष देऊ की एका महिन्यात तो किती सामने खेळणार आहे, आम्ही त्याच्यासाठी ज्या योजना आखल्या आहेत, त्या तो किती बरा झाला आहे, त्यावर अवलंबून आहेत. आम्ही सातत्याने एनसीएच्या संपर्कात आहोत आणि सध्यातरी आम्ही त्याच्याबाबत सकारात्मक आहोत.'
दरम्यान, यापूर्वीच बीसीसीआयने बुमराहच्या तंदुरुस्तीबद्दल अपडेट दिल्या होत्या. बीसीसीआयने दिलेल्या अपडेटनुसार बुमराहची रिहॅब प्रक्रिया अखेरच्या टप्प्यात असून तो पूर्ण ताकदीने नेट्समध्ये गोलंदाजी करत आहे. तसेच त्याच्यासाठी एनसीएमध्ये सराव सामने आयोजित केले जातील. त्यानंतर त्याच्या पुनरागमनाबद्दल अंतिम निर्णय घेतला जाईल.
बुमराहच्या बाबतीत सर्व गोष्टी योग्य झाल्या, तर तो 18 ऑगस्टपासून आयर्लंडविरुद्ध सुरू होणाऱ्या 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत खेळताना दिसू शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.