Mohammad Rizwan And Iftikhar Ahmed  Dainik Gomantak
क्रीडा

World Cup मध्ये धर्माची एन्ट्री, मोहम्मद रिझवानविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल!

World Cup 2023: आयसीसी विश्वचषकात धर्माची एन्ट्री झाली आहे. पाकिस्तान संघाचा स्टार फलंदाज मोहम्मद रिझवानसाठी संकट निर्माण झाले आहे.

Manish Jadhav

World Cup 2023: आयसीसी विश्वचषकात धर्माची एन्ट्री झाली आहे. पाकिस्तान संघाचा स्टार फलंदाज मोहम्मद रिझवानसाठी संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे रिझवान तसेच पाकिस्तान संघाच्या अडचणी वाढू शकतात.

शानदार फॉर्ममध्ये असलेल्या मोहम्मद रिझवानविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर कधीही सुनावणी होऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाव्यतिरिक्त रिझवानविरोधात तक्रार दाखल करणाऱ्या वकिलानेही आयसीसी अध्यक्षांकडे तक्रार केली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण

पाकिस्तानचा (Pakistan) स्टार फलंदाज आणि यष्टिरक्षक मोहम्मद रिझवानने 6 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध नेदरलँड्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान नमाज अदा करण्यास सुरुवात केली होती.

रिझवानने मैदानावर गुडघ्यावर बसून नमाज अदा करण्यास सुरुवात केली, यासाठी एका वकिलाने त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. रिझवानच्या विरोधात याचिका दाखल करताना वकिलाने मोहम्मद रिझवानच्या खिलाडूवृत्तीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

रिझवानने हजारो भारतीय चाहत्यांमध्ये जाणूनबुजून नमाज अदा केल्याचे वकिलाने सांगितले. त्याचा उद्देश त्याच्या धर्माच्या जाणीवपूर्वक चित्रणाचे प्रतीक आहे, जे खेळ भावनेच्या विरुद्ध आहे, असे वकिलाचे म्हणणे आहे.

रिझवानच्या वक्तव्यावरही गदारोळ

रिझवानविरोधात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) तक्रार दाखल करणाऱ्या वकिलाचे नाव विनीत जिंदाल आहे. या तक्रारीची प्रतही जिंदाल यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर पोस्ट केली आहे.

रिझवानविरुद्धच्या तक्रारीत पुढे म्हटले आहे की, मैदानावर त्याच्या धर्माचे प्रतिनिधित्व करणे आणि गाझामधील लोकांसाठी त्याच्या विजयाचे समर्पण करण्याबद्दल पत्रकार परिषदेत त्याचे विधान त्याच्या धार्मिक आणि राजकीय विचारसरणीची पुष्टी करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT