

काही दिवसांपूर्वी सायबर गुन्हे जागृतीसंबंधी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एका उच्च माध्यमिक विद्यालयात गेले होते. ‘तुमच्यापैकी किती जणांना सायबर गुन्हा कसा नोंदवावा हे माहीत आहे?’ असा प्रश्न दोनशेच्या घरात असलेल्या प्रेक्षकवर्गाला परत परत विचारूनही एकही हात वर आला नाही. जन्मापासून मोबाइल सखा असलेल्या ह्या ‘डिजिटल नेटिव्ह’ पिढीला ही जुजबी माहिती, खरे तर पाठ्यपुस्तकी ज्ञानाबरोबरच, देणे ही आजच्या काळाची गरज आहे. पण त्यासाठी त्यांच्या पाल्यांना, शिक्षकांना आणि इतर संबंधितांनाही हे ज्ञान असणे आवश्यक आहे. शासन खास करून गोवा पोलिसांचे सायबर सेल विविध माध्यमांतून ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. जबाबदार नागरिक म्हणून आपल्यापैकी प्रत्येक
नागरिकाने ही माहिती जाणून घेणं महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर सभोवतालच्या दहा लोकांमध्ये -खास करून, मुले आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये याविषयी जागरूकता प्रत्येक सायबर जागरूक नागरिकाने केली तरच वाऱ्याच्या वेगाने फोफावणाऱ्या या सायबरगुन्ह्यांच्या किडीला थोडा तरी आवर घालणे शक्य होईल.
यातील पहिला नियम हा, की तुम्ही कुठल्याही प्रकारच्या लहानमोठ्या सायबर गुन्ह्यांचे शिकार झालात तर त्याची योग्य प्लेटफॉर्मवर नोंद केल्याशिवाय राहू नका. तुमची एक तक्रार अनेक सायबर गुन्ह्यांची साखळी तोडू शकते. अगदी फोन किंवा मेसेज करून फसवण्याचा नुसता प्रयत्न ते आर्थिक फसवणूक, प्रत्येक गोष्टीची अधिकृतरीत्या, योग्य माध्यमावर नोंद कराच. तुम्ही गुन्हा नोंद करताना सायबर गुन्हेगारांसंबंधी दिलेली - मोबाइल नंबर, बँक अकाउंट, वेबसाइट, त्यांची गुन्हा करण्याची ‘मोडस ऑपरेंडी’ या प्रकारची माहिती इतर अनेकांना अशा गुन्ह्यांना बळी पडण्यापासून वाचवू शकते.
महत्त्वाचे म्हणजे गुन्हा नोंद करणे म्हणजे लवकरात लवकर पोलीसस्टेशनात प्रत्यक्ष जाणे हे समीकरण अशा प्रकारच्या गुन्ह्यांत आता माग पडतेय. असे लहान मोठे सायबर गुन्हे नोंदवण्यासाठी शासनातर्फे वेबसाइटस, हेल्पलाईन नंबर, ऍप्स इत्यादी अनेक प्लॅटफॉर्म्स तयार केले गेले आहेत.
यदाकदाचित तुम्ही कधी अशा प्रकारच्या गुन्ह्यांचे शिकार बनलात तर काय करायचं? सगळ्यात पहिली पायरी आहे गुन्ह्याशी संबंधित माहितीचे योग्य संकलन करणे. तुम्हांला गुन्हेगाराकडून ज्या नंबरवरून फोन वा मेसेजीस आले तो फोन नंबर, जर तुम्हांला वेबसाइटद्वारे फसवले गेले असेल तर त्या वेबसाईटचे युआरएल, चॅट्सचे लॉग, पावत्या इत्यादी.
आपण फसवलो गेलोय हे लक्षात आल्याबरोबर करायची एक गोष्ट म्हणजे होता होईल तेवढे ‘स्क्रीनशॉट’ काढणे. संबंधित कॉल रेकॉर्ड्स, मॅसेजीस, फेसबुक- इंस्टाग्राम- ट्विटर यांसारख्या सोशल मीडिया संबंधित गुन्हा असेल तर तिथल्या प्रोफाईल, झालेले परस्पर संवाद, फसवण्यासाठी वापरल्या गेलेल्या वेबसाइट, गूगल किंवा इतर यूपीआयद्वारे केल्या गेलेले पेमेंट, आलेले क्युआर कोड, आर्थिक फसवणुकीत बँकेकडे झालेले सर्व व्यवहार एकूण गुन्हेगाराशी संपर्कात आल्यानंतर झालेल्या प्रत्येक ऑनलाइन घटनेचे घेता येतील तेवढे ‘स्क्रीनशॉट’ घेऊन ते ठरावीक जागी आधी सेव्ह करून ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे.
हे ‘स्क्रीनशॉटस’ तुमच्याविरुद्ध झालेल्या गुन्ह्यांचे भक्कम पुरावे बनून तुम्हांला योग्य न्याय मिळवून देऊ शकतात आणि आर्थिक फसवणुकीवेळी तुमचे पैसे तुम्हांला परत मिळण्याची शक्यता वाढवतात.
त्यानंतरची दुसरी पायरी आहे संबंधित गुन्ह्याची नोंद करणे. तुम्हांला फसवायचा नुसता प्रयत्न झालाय वा तुम्ही खरोखर फसवले गेला आहात, तरीही ह्या दोन्ही प्रकारात गुन्हा नोंद करण्यासाठीच्या ऑनलाइन सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध आहेत. ‘१९३०’ ही खरे तर देश पातळीवरील हेल्पलाईन.
पण गोवा सायबर क्राइम सेलतर्फे ह्या हेल्पलाईनवरचे कॉल घेण्यासाठीचे खास वेगळे कॉल सेंटर हल्लीच स्थापन केले गेले आहे. त्यामुळे कॉल लवकर लागतो. याचबरोबर गोवा सायबरसेलची ७८७५७५६२२२ ही व्हॉट्सअप हेल्पलाईनही गोवेकरांसाठी उपलब्ध आहे.
सर्वात आधी पाहूया, प्रचंड प्रमाणात होत असल्याने सगळ्यांचीच डोकेदुखी ठरलेल्या आर्थिक फसवणुकी संबंधात गुन्हा कसा नोंदवायचा. आपण संकलित केलेली माहिती समोर ठेवून, सरळ ‘१९३०’वर कॉल करून काय झालेय ते सविस्तर सांगून गुन्हा नोंद करता येतो. ही पद्धत तंत्रज्ञानाशी जास्त सलगी नसलेल्यांसाठी उपयुक्त असली तरी यात काही तपशील राहून जाण्याची भीती असते. याला पर्याय म्हणजे हींींिी://लूलशीलीळाश.र्सेीं.ळप/ या पोर्टलवर जाऊन तक्रार करणे.
त्यासाठी आम्हांला पहिल्यांदा स्वतःचा मोबाइल आणि ईमेल आयडी देऊन अकाउंट करावा लागतो. मग लॉगिन करून आपण आपली तक्रार तिथे सविस्तर नोंदवू शकतो. त्याचबरोबर आपण संकलित केलेले सर्व पुराव्यांचे फोटो आपण ह्या पोर्टलवर अपलोड करू शकतो. हे सारे करण्यासाठीची प्रक्रिया अतिशय सोपी आणि सरळ आहे. जेवढे जास्त तपशील तुम्ही तक्रार करताना द्याल तेवढे पोलिसांना गुन्हेगारांपर्यंत पोहोचायला जास्त सोपे जाते. ‘१९३०’ किंवा सायब्रक्राइम पोर्टलवर तुमची तक्रार नोंद करून झाल्यानंतर तुमची तक्रार आपोआप तुम्ही ज्या पोलिस स्टेशनच्या अधिकारक्षेत्रात येता तिथे नोंद केली जाते.
एसएमएसद्वारे तुमची तक्रार कुठल्या पोलिसस्टेशनमध्ये नोंद केलीय याचीही माहिती तुम्हांला दिली जाते. त्यानुसार, तुमच्या फावल्या वेळेत तुम्ही संबंधित पोलिसस्टेशनमध्ये जाऊन तसंच ऑनलाइन माध्यमातूनही योग्य तो पाठपुरावा करू शकता. ह्यात एक लक्षात ठेवण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, फसवलो गेलोय हे लक्षात आल्याबरोबर १ ते ३ तासांत, म्हणजे पोलिसांच्या भाषेत ‘गोल्डन पिरिअड’मध्ये दाखल केल्या गेलेल्या तक्रारींमध्ये गेलेले पैसे परत मिळण्याची शक्यता सर्वाधिक आहे.
फसवणूक करणारे पैसे त्वरित एका खात्यातून दुसऱ्या खात्यात किंवा खात्याबाहेर हालवतात, त्यामुळे लवकर तक्रार केल्यास बँका संबंधित व्यवहार फ्रीज किंवा ब्लॉक करून पैसे गायब होण्यापासून रोखू शकतात. म्हणूनच उगाच वेळ न दवडता होता होईल तेवढ्या लवकर ‘१९३०’ किंवा सायबर क्राइम पोर्टलवर तक्रार करून टाकायला हवी.
जर तुम्ही आर्थिक सोडून इतर साइबर गुन्ह्यांचे शिकार आहात तरीही हींींिी://लूलशीलीळाश.र्सेीं.ळप/ द्वारे तक्रार तुम्हांला करता येते आणि तीही तुमच्या संबंधित पोलिसस्टेशनकडे आपोआप सुपूर्द केली जाते.
त्यातही, जर तुम्हांला फसवण्याचा फक्त प्रयत्न केला गेलाय तरीही हींींिी://लूलशीलीळाश.र्सेीं.ळप/ आणि हींींिी://ीरपलहरीीररींहळ.र्सेीं.ळप/ ह्या पोर्टल्सवर जाऊन तुम्ही तक्रार नोंदवू शकता. संचारसाथीचे यासाठीच एक ऍपही उपलब्ध आहे. अशा तक्रारींमध्ये तुम्हांला पोलीसस्टेशनमध्ये जाऊन पाठपुरावा करायची गरज नाही. पण तुम्ही दिलेली माहिती इतरांना सावध करण्यासाठी या पोर्टलांद्वारे वापरली जाते.
तर महत्त्वाचा मुद्दा हा आहे की झालेल्या किंवा करायचा प्रयत्न केल्या गेलेल्या सायबरक्राइमविषयी मूग गिळून गप्प राहाल तर ते ह्या बांडगुळाला खतपाणी घालून फोफावण्यासाठी अप्रत्यक्षपणे मदत केल्यासारखेच होईल. तुम्ही दाखवलेल्या थोड्याशा सक्रियतेने कुणीतरी जीवनातून उठण्यापासून वाचू शकते, हे ध्यानात ठेवा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.