World Cup 2023: विश्वचषक 2023 च्या 14 व्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने श्रीलंकेचा 5 गडी राखून पराभव करुन पहिला विजय नोंदवला. पहिले दोन सामने गमावल्यानंतर कांगारु संघाने आता आपले खाते उघडले आहे.
या सामन्यातही कांगारु संघाने 210 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाच विकेट गमावल्या होत्या. याआधी दोन्ही सामन्यात कांगारु संघाला 200 धावांचा टप्पाही पार करता आला नव्हता. या सामन्यात संघाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ आपले खातेही उघडू शकला नाही.
दरम्यान, स्टीव्ह स्मिथच्या (Steve Smith) नावावर अनोखा विक्रम नोंदवला गेला आहे. विशेष म्हणजे, हा विक्रम याआधी कोणत्याही कांगारु फलंदाजाच्या नावावर नोंदवला गेलेला नाही. अद्याप विश्वचषकात स्टीव्ह स्मिथचा जलवा दिसला नाही.
स्मिथने दोन डावात 19 आणि 46 धावा केल्या होत्या. तिसऱ्या सामन्यात त्याला खातेही उघडता आले नाही. तसेच, यावर्षी त्याने भारतीय भूमीवर एक लाजिरवाणा विक्रम केला.
भारतीय भूमीवर स्टीव्ह स्मिथचा हा वर्षातील चौथा डक आहे. याआधी भारतात एकही ऑस्ट्रेलियन फलंदाज एका वर्षात चार वेळा शून्यावर बाद झाला नव्हता. यापूर्वी एकदिवसीय विश्वचषकापूर्वी झालेल्या वनडे मालिकेतही स्मिथने फलंदाजी केली नव्हती.
दुसरीकडे, जर त्याच्या आकडेवारीबद्दल बोलायचे झाल्यास, स्मिथने ऑस्ट्रेलियाबाहेर 77 एकदिवसीय डावात 2506 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 35 आहे, ज्यात तीन शतके आणि 18 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच, विश्वचषकातील त्याचे हे पहिलेच डक ठरले.
पॉइंट टेबलबद्दल बोलायचे झाल्यास, पहिले दोन सामने गमावल्यानंतर तिसरा सामना जिंकून कांगारु संघाने आपले खाते उघडले. या विजयानंतर त्याच्या नावावर दोन गुणांची नोंद झाली. या विजयासह ऑस्ट्रेलियन संघ गुणतालिकेत 8व्या स्थानावर पोहोचला आहे. तर टीम इंडिया (Team India) अव्वल स्थानावर आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.