Virat Kohli, Pat Cummins, Usman Khawaja 
क्रीडा

ICC Awards: ऑस्ट्रेलियन कर्णधार सर्वोत्तम क्रिकेटर, तर विराट, ख्वाजाचाही 'या' पुरस्कारांनी गौरव; पाहा विजेत्यांची यादी

Pranali Kodre

ICC Cricketer of the Year award 2023:

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून 2023 वर्षात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव केला जात आहे. काही दिवसांपूर्वीच विविध विभागातील पुरस्कारांसाठी आयसीसीने खेळाडूंना नामांकन दिले होते. आता आयसीसीकडून पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली जात आहे.

आयसीसीने गुरुवारी (25 जानेवारी) सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू, सर्वोत्तम पुरुष वनडे क्रिकेटपटू आणि कसोटीपटूच्या पुरस्कारांची घोषणा केली आहे. याबरोबरच सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूला दिल्या जाणाऱ्या रेचल हेहो फ्लिंट पुरस्कार इंग्लंडच्या नतालिया सायव्हर-ब्रंट या खेळाडूला मिळाला आहे. तिने सलग दुसऱ्यांदा या पुरस्कारावर नाव कोरले आहे.

आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार आयसीसीचा सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूला दिला जाणारा सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सला जाहीर झाला आहे.

त्याचबरोबर सर्वोत्तम पुरुष वनडे क्रिकेटपटूचा पुरस्कार विराट कोहलीला घोषित झाला आहे, तर सर्वोत्तम कसोटीपटूचा पुरस्कार उस्मान ख्वाजाला देण्यात आला आहे. याशिवाय सूर्यकुमार यादवला सर्वोत्तम टी20 क्रिकेटपटूचा पुरस्कार देण्यात आला आहे.

आयसीसी 2023 पुरस्कार

  • सर्वोत्तम उदयोन्मुख पुरुष क्रिकेटपटू - रचिन रविंद्र (न्यूझीलंड)

  • सर्वोत्तम उदयोन्मुख महिला क्रिकेटपटू - फोबी लिचफिल्ड (ऑस्ट्रेलिया)

  • सर्वोत्तम टी20 पुरुष क्रिकेटपटू - सूर्यकुमार यादव (भारत)

  • सर्वोत्तम टी20 महिला क्रिकेटपटू - हेली मॅथ्यूज (वेस्ट इंडिज)

  • सर्वोत्तम वनडे पुरुष क्रिकेटपटू - विराट कोहली (भारत)

  • सर्वोत्तम वनडे महिला क्रिकेटपटू - चामरी अटापट्टू (श्रीलंका)

  • सर्वोत्तम कसोटीपटू - उस्मान ख्वाजा (ऑस्ट्रेलिया)

  • सर गॅरी सोबर्स ट्रॉफी (सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू 2023) - पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया)

  • रेचल हेहो फ्लिंट ट्रॉफी (सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू 2023) - नतालिया सायव्हर-ब्रंट (इंग्लंड)

  • सर्वोत्तम पंच - रिचर्ड इलिंगवर्थ

  • सहसदस्य संघातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू - बास दे लीड (नेदरलँड्स)

  • सहसदस्य संघातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू - क्विंटर एबेल (केनिया)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

Saint Estevam Accident: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी मित्र कल्पराज आणि प्रेयसीची दोन तास चौकशी; पोलिसांकडून प्रश्नांची सरबत्ती!

Goa Today's News Live: DNA चाचणी मागणीचा वाद; कोलवा सर्कल ब्लॉक, वाहतूक वळवली!

Sunburn Festival 2024: सनबर्नविरोधात कामुर्लीत स्थानिकांचा कडक विरोध; उद्याची बैठक ठरणार निर्णायक!

Mhadei Water Dispute: ...कर्नाटकाविरोधात लढण्यास सावंत सरकार ठरले कुचकामी; आलेमाव यांचा घणाघात

SCROLL FOR NEXT