GCA Premier League Cricket | Kashyap Bakhale Dainik Gomantak
क्रीडा

GCA Premier League Cricket: पणजी जिमखाना पराभवाच्या छायेत

एमसीसीविरुद्ध 255 धावांच्या आव्हानासमोर 5 बाद 84 अशी स्थिती

Akshay Nirmale

GCA Premier League Cricket: एमसीसी संघाने विजयासाठी 255 धावांचे आव्हान दिल्यानंतर दुसऱ्या डावात 5 बाद 84 धावा अशी घसरगुंडी उडालेल्या पणजी जिमखान्यावर पराभवाचे संकट कायम राहिले. मात्र गोवा क्रिकेट असोसिएशनच्या प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेची उपांत्य फेरी अगोदरच गाठल्यामुळे सामना गमावल्यामुळे नुकसान होणार नाही.

पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानाच्या खेळपट्टीने गुरुवारीही फलंदाजांना साथ दिली नाही. सामन्याच्या पहिल्या दिवशी 18 गडी बाद झाले होते, गुरुवारी एकूण 17 विकेट पडल्या.

पणजी जिमखान्याचा पहिला डाव 161 धावांत आटोपल्यामुळे एमसीसीला 18 धावांची निसटती आघाडी मिळाली. नंतर शुभम देसाईने पाच गडी टिपल्यामुळे एमसीसीचा दुसरा डाव 236 धावांत संपुष्टात आला.

कश्यप बखलेचे झुंजार शतक

सांगे मैदानावर दीपराज गावकरच्या झंझावाती शतकामुळे (162 धावा, 135 चेंडू, 20 चौकार, 3 षटकार) साळगावकर क्रिकेट क्लबने 56 पेनल्टी धावांसह पहिल्या डावात 450 धावा केल्या. नंतर चौगुले स्पोर्टस क्लबने कश्यप बखले याच्या झुंजार नाबाद शतकाच्या (110 धावा, 169 चेंडू, 16 चौकार) बळावर सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर 3 बाद 216 धावा केल्या.

ते अजून 234 धावांनी मागे आहेत. कश्यपने वीर यादव (55) याच्यासह तिसऱ्या विकेटसाठी 121 धावांची, तर समर दुभाषी (40) याच्यासह चौथ्या विकेटसाठी 86 धावांची अभेद्य भागी केली.

संक्षिप्त धावफलक

पर्वरी मैदानावर

एमसीसी, पहिला डाव ः 179 व दुसरा डाव ः 55.4 षटकांत सर्वबाद 236 (प्रथमेश गावस 42, पियुष यादव 46, शुभम देसाई 5-61, मनीष काकोडे 2-70, हेरंब परब (फिरकी) 3-39) विरुद्ध पणजी जिमखाना, पहिला डाव ः 161 (दर्शन मिसाळ 4-47, कीथ पिंटो 3-43) व दुसरा डाव ः 22 षटकांत 5 बाद 84 (हेरंब परब (वेगवान) 3-11, कीथ पिंटो 2-46).

सांगे मैदानावर

साळगावकर क्रिकेट क्लब, पहिला डाव ः 110.4 षटकांत सर्वबाद 450 (दीपराज गावकर 162, मोहित रेडकर 3-128, जगदीश पाटील 2-65, सचिन मिश्रा 4-55) विरुद्ध चौगुले स्पोर्टस क्लब, पहिला डाव ः 60 षटकांत 3 बाद 216 (वीर यादव 55, कश्यप बखले नाबाद 110, समर दुभाषी नाबाद 40, विजेश प्रभुदेसाई 2-13).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा एकदम दणक्यात! सरकारकडून महागाई भत्त्यात 'इतक्या' टक्क्यांची घसघशीत वाढ; मिळालं तगडं गिफ्ट

Kumar Kushagra Century: भारतीय फलंदाजीचा नवा हुकमी एक्का! 21 वर्षाच्या पोरानं ठोकलं शानदार शतक, कांगारुंची काढली पिसं; सिलेक्टर्सचं वेधलं लक्ष

श्रीलंकन कोर्टाचा मोठा निकाल! ईस्टर साखळी बॉम्बस्फोटातील 15 दोषींना सुनावली प्रत्येकी 220 वर्षांची शिक्षा; 11 भारतीयांसह 270 बळींना न्याय

Ranji Trophy: गोव्याचा स्वप्नील अस्नोडकर आता केरळचा मुख्य प्रशिक्षक! रणजीसह वनडे-टी-20 संघाचीही जबाबदारी; 2026-27मोसमासाठी मोठी संधी

Vagator Turtle Protection: वागातोर किनाऱ्यावर कासवांची 24 तास निगराणी! ऑलिव्ह रिडलेच्या अंड्यांच्या संरक्षणासाठी वन विभागाची कडक गस्त

SCROLL FOR NEXT