RFDL Football Goa: एफसी गोवाची सेझा अकादमीवर सहज मात

एफसी गोवाची पुढील लढत 28 मार्च रोजी चर्चिल ब्रदर्सशी
Football
Football Dainik Gomantak
Published on
Updated on

RFDL Football Goa: आरएफडीएल (रिलायन्स फाऊंडेशन डेव्हपलमेंट लीग) फुटबॉल स्पर्धेच्या गोवा विभागीय फेरीत एफसी गोवा संघाने विजयी सलामी देताना सेझा फुटबॉल अकादमीवर 2-0 फरकाने सहज मात केली. सामना गुरुवारी माँत द गिरी मैदानावर झाला.

Football
WPL 2023: 'चिकनी चमेली'वर जेमिमाह रोड्रिग्जसह थिरकले दिल्ली कॅपिटल्सचे खेळाडू, Video Viral

एफसी गोवाने सामना जिंकताना दोन्ही अर्धात प्रत्येकी एक गोल केला. लेस्ली रिबेलो याने 34 व्या, तर सॅलजिओ डायस याने 60 व्या मिनिटास गोल नोंदवून संघाचा विजय पक्का केला.

बुधवारी द्वितीय विभाग आय-लीग स्पर्धेत धेंपो क्लबविरुद्ध एका गोलने निसटते पराभूत झालेल्या एफसी गोवा डेव्हलपमेंट संघाने गुरुवारी सामन्यावर पूर्ण वर्चस्व राखले. त्यांचा स्पर्धेतील पुढील सामना 28 मार्च रोजी चर्चिल ब्रदर्सविरुद्ध होईल.

एफसी गोवाने अर्ध्या तासाच्या खेळानंतर आघाडी घेतली. माल्सॉमत्लुआंगा याचा क्रॉस पास रोखले सेझा अकादमीचा खेळाडूस जमले नाही, त्याचा लाभ उठवत लेस्ली याने भेदक हेडिंग साधले.

तासाभराचा खेळ झालेला असताना एफसी गोवाची आघाडी वाढली. बदली खेळाडू साईश गावकर याच्या शानदार असिस्टवर सॅलजिओ याचे हेडिंग अचूक ठरले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com