Ashish Nehra & Neeraj Chopra Dainik Gomantak
क्रीडा

पाकिस्तानी पुढाऱ्याला कुणी तरी सांगा Neeraj Chopra अन् आशीष नेहरा वेगळायं

Ashish Nehra: भारताचा माजी क्रिकेटर आणि वेगवान गोलंदाज आशिष नेहरा सोशल मीडियावर खूप ट्रेंड करत आहे.

दैनिक गोमन्तक

Ashish Nehra Trending: भारताचा माजी क्रिकेटर आणि वेगवान गोलंदाज आशिष नेहरा सोशल मीडियावर खूप ट्रेंड करत आहे. खरे तर प्रकरणच असे आहे की, लोकांना नेहराची चेष्टा केल्याशिवाय राहवत नाहीये. पाकिस्तानचे राजकीय तज्ज्ञ झायेद हमीद यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भालाफेकमध्ये सुवर्ण जिंकल्याबद्दल पाकिस्तानच्या अर्शद नदीमचे अभिनंदन करताना असेच काहीसे घडले.

दरम्यान, अभिनंदन करण्याच्या प्रक्रियेत ते नीरज चोप्रा (Neeraj Chopra) आणि आशिष नेहरा यांच्याबाबतीत गोंधळून गेले. झायेद हमीद यांनी अर्शदची तुलना भारतीय भालाफेकपटूशी केली, मात्र या तुलनेत नीरजच्या जागी आशिष नेहराचे नाव लिहिले. यानंतर बुधवारी सोशल मीडियावर नेहराच्या बाबतीत वेगवेगळ्या प्रकारचे मीम्स व्हायरल होऊ लागले. लोकांनी खूप कमेंटही केल्या. एवढेच नाही तर वीरेंद्र सेहवागनेही (Virender Sehwag) त्याची खिल्ली उडवली.

दुसरकीडे, झायेद यांचे हे ट्विट दोन चुकांमुळे व्हायरल होत आहे. सर्वप्रथम, नीरज बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्सचा भागही नव्हता, तर झायेद यांनी लिहिले की, अर्शदने एका भारतीय खेळाडूला पराभूत केले. दुसरे कारण म्हणजे त्यांनी नीरज चोप्राऐवजी (Neeraj Chopra) आशिष नेहराचे नाव लिहिले.

वास्तविक, पाकिस्तानी भालाफेकपटू अर्शदने बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये 90 मीटर फेक करुन सुवर्णपदक जिंकले होते. यानंतर, पाकिस्तानी राजकीय तज्ञ झायेद यांनी लिहिले - 'हा विजय देखील नेत्रदीपक आहे, कारण पाकिस्तानी खेळाडूने भारताचा नायक आशिष नेहराचा पराभव केला.'

तसेच, 'मागील स्पर्धेत आशिष नेहराने अर्शद नदीमचा पराभव केला होता. काय मस्त बदला घेतलाय.....,' झायेदचे हे ट्विट दोन चुकांमुळे व्हायरल होत आहे. सर्वप्रथम, नीरज बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्सचा भागही नव्हता, तर झायेदने लिहिले की, अर्शदने एका भारतीय खेळाडूला पराभूत केले. दुसरे कारण म्हणजे त्याने नीरज चोप्राऐवजी आशिष नेहराचे नाव लिहिले.

यानंतर, सेहवागने गंमतीने आशिष नेहराची तुलना इंग्लंडचे पंतप्रधानपदाचे उमेदवार ऋषी सुनक यांच्याशी केली. सेहवागने लिहिले- चिचा, आशिष नेहरा सध्या यूकेमध्ये पंतप्रधानपदाच्या निवडणुकीची तयारी करत आहे. त्यामुळे निश्चिंत रहा.

त्याचवेळी, भारत रामराज नावाच्या सोशल मीडिया यूजरने लिहिले - झायेद यांच्या म्हणण्यानुसार, नीरज बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये (Commonwealth Games) सहभागी झाला होता. ही नवीन आणि मोठी बातमी आहे. झायेद हमीद यांचे ट्विटर अकाउंट भारतात बॅन आहे. मात्र, त्यांच्या ट्विटचा स्क्रीन शॉट चांगलाच व्हायरल होत आहे.

खरे तर, नदीम आणि चोप्रा खूप चांगले मित्र आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेत नदीमने 90 मीटर भालाफेक केल्यानंतर नीरजने सर्वप्रथम त्याचे अभिनंदन केले. अर्शदने कॉमनवेल्थ गेम्समध्ये वर्ल्ड चॅम्पियन अँडरसन पीटर्सचा पराभव करुन सुवर्णपदक जिंकले. नदीम गेल्या वर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये आणि बर्मिंगहॅम गेम्सच्या एक आठवडा आधी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही पदकांपासून वंचित राहिला होता. नीरजने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. त्याचवेळी नीरजने जागतिक स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sancoale: पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला, खोटं सांगून केलं दुसरं लग्न; सांकवाळच्या प्रभारी सरपंचांवर गुन्हा दाखल

Goa Politics: '..राहुल गांधींकडे सर्व प्रकार मांडणार'! अमित पाटकर यांनी दिली माहिती; काँग्रेस, NSUI मधील वाद शिगेला

Bits Pilani: ‘बिट्स पिलानी’त विद्यार्थी मृत,कॅम्पसमधील धक्कादायक घटना; पोलिसांचा चहूबाजूंनी तपास

Rashi Bhavishya 17 August 2025: करिअरमध्ये प्रगती, प्रवासाचे योग ; मात्र आरोग्याकडे लक्ष द्या

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

SCROLL FOR NEXT