Neeraj Chopra Stadium: खेळाच्या विकासासाठी मदत पुरवण्यास केंद्र सरकार बांधील

पुणे (Pune) येथील लष्कराच्या क्रीडा मैदानाचे (Military sports ground) 'नीरज चोप्रा स्टेडियम' असे नामकरण (Neeraj Chopra Stadium)
नीरजला चोप्राला भाल्याची प्रतिकृती भेट देताना देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Neeraj Chopra Stadium)
नीरजला चोप्राला भाल्याची प्रतिकृती भेट देताना देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Neeraj Chopra Stadium) Dainik Gomantak

Neeraj Chopra Stadium: देशामध्ये खेळाचा विकास करण्यासाठी आवश्यक ती मदत केंद्र सरकार पुरवण्यासाठी बांधील आहे. आणि देशातील प्रत्येक खेळाडूला याविषयी माहिती आहे, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defense Minister Rajnath Singh) यांनी पुणे येथे केले.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज पुणे येथे लष्कराच्या क्रीडा संस्थेस भेट दिली त्यावेळी ऑलम्पिक (Tokyo Olympics 2020) मध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सोळा खेळाडूंचा गौरव करण्यात आला. लष्कराच्या या क्रीडा मैदानाचे नीरज चोप्रा (Neeraj Chopra) स्टेडियम असे नामकरणही करण्यात आले.

नीरजला चोप्राला भाल्याची प्रतिकृती भेट देताना देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Neeraj Chopra Stadium)
Afghanistan: 'कृपया अफगाण लोकांची हत्या थांबवा'; क्रिकेटपटूचा भावनिक संदेश

भारताने देशात खेळ वाढण्यासाठी कधीच व कोणतीच तडजोड केली नाही आणि करणारही नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः क्रीडाप्रेमी असून ते खेळाला प्रोत्साहन देण्यात ही सर्वांच्या पुढे असतात असेही म्हणाले.

देशातील राज्य सरकारी खेळावर घेत असलेल्या मेहनतीचे कौतुकही राजनाथ सिंह यांनी केले. सांघिक आणि वैयक्तिक खेळाला प्रोत्साहन देणे हे सरकारचे काम आहे. व राज्य सरकारही याबाबतीत मागे नाही असे राजनाथ सिंह म्हणाले.

नीरजला चोप्राला भाल्याची प्रतिकृती भेट देताना देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Neeraj Chopra Stadium)
India Football: एफसी गोवातर्फे एकच सामना खेळलेला फ्रांग्की मुक्त

पुणे येथे झालेल्या या गौरव सोहळ्यात तरुणदीप राय, प्रवीण जाधव (तिरंदाज), अमित कुमार, मनिष कौशिक, सतीश कुमार(बॉक्सिंग), सी के कुटप्पा, छोटेलाल यादव (बॉक्सिंग प्रशिक्षक), दीपक पूनिया (कुस्ती), अरुणलाल जाट, अरविंद सिंग (रोइंग), विष्णू सर्वानन (सेलिंग) व निरज चोप्रा या खेळाडूंचा गौरव करण्यात आला यावेळी नीरजला भाल्याची प्रतिकृती भेट देण्यात आली या कार्यक्रमामध्ये लष्कर प्रमुख एम नरवणे सुद्धा उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com