Neeraj Chopra Injury: भारताच्या आशांना मोठा धक्का, नीरज चोप्रा राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर

जगातील सर्वोत्कृष्ट भालाफेकपटू नीरज चोप्रा राष्ट्रकुल 2022 मधून बाहेर पडला आहे. त्यामुळे भारताच्या आशा कोमेजल्या आहेत
neeraj chopra
neeraj chopraDainik Gomantak

Neeraj Chopra Injury CWG 2022: कॉमनवेल्थ गेम्स 2022 बर्मिंगहॅम येथे होणार आहे. याआधीच भारताच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक आणि नुकतेच जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक मिळवणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर पडला आहे. दुखापतीमुळे तो स्पर्धेतून बाहेर पडल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अधिकारी राजीव मेहता यांनी सांगितले की, नीरजला दुखापत झाली आहे. यामुळे तो 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही.

neeraj chopra
Yuzvendra Chahal च्या आयकॉनिक पोजमध्ये आवेश खान आणि अक्षर पटेल; फोटो व्हायरल

जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपनंतर नीरजचा एमआरआय स्कॅन करण्यात आला. यामध्ये कंबरेच्या दुखापतीची बाब समोर आली.त्यामुळे नीरजला जवळपास महिनाभर विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. याच कारणामुळे तो 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर पडला आहे. कॉमनवेल्थ गेम्समध्ये नीरजची मॅच 5 ऑगस्टला होणार होती. पण नीरजच्या बाहेर पडल्याने भारताला मोठा धक्का बसला आहे. भालाफेकमध्ये नीरजच्या अनुपस्थितीत भारतीयांना रोहित यादव आणि डीपी मनूकडून मोठ्या आशा असतील.

neeraj chopra
IND vs Pak : क्रिकेटप्रेमींसाठी मोठी बातमी! लवकरच पाहायला मिळणार 'भारत-पाक'चा सामना

दरम्यान, जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमधील भालाफेक स्पर्धेत भारताचा ऑलिम्पिक चॅम्पियन भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) करोडो भारतीयांच्या आशा घेऊन मैदानात उतरला होता. भारतीयांना निराश न करता नीरजने तब्बल 19 वर्षानंतर भारताला जागरिक स्पर्धेत पदक मिळवून दिले. आणि एक इतिहास रचला. रोहित यादवही या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत होता. मात्र त्याला अपयश आल्यानंतर World Athletics Championships स्पर्धेत गोल्डन बॉय नीरज चोप्रा रोप्य पदकाचा मानकरी ठरला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com