विराट कोहलीने शनिवारी भारताचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेताला आहे. हा निर्णय घेण्याच्या एक दिवस आधी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघाला 1-2 असा पराभव स्वीकारावा लागला होता. कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखाली भारताने 68 कसोटी सामने खेळले त्यापैकी 40 जिंकले. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात संस्मरणीय विजय नोंदवला.
त्याच्या कर्णधार पद सोडण्याच्या निर्णयावर अनेक माजी आणि आजी क्रिकेटपटूंनी सोशल मिडियावर (Social Media) कोहलीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. कोहलीच्या कर्णधार पद सोडण्याच्या निर्णयावर अनेक पाकिस्तानी खेळाडू आणि चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेदरम्यान धोनीने कर्णधार पद सोडल्यानंतर विराट कोहलीने संघाची धुरा हाती घेतली. कोहलीने 2014 मध्ये संघाची हाती घेतल्यानंतर 68 मालिकेत 40 विजयासह यशस्वी कर्णधार बनला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.