Iftikhar Ahmed Viral Video: सोशल मीडियावर पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या इंग्रजी बोलण्याच्या शैलीवरुन मीम्स व्हायरल होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी इंजमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान आणि सर्फराज अहमद यांच्या सामन्यानंतरच्या मुलाखती सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्या होत्या. आता यात पाकिस्तानचा आणखी एक क्रिकेटपटू इफ्तिखार अहमद याची भर पडली. सध्या सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका मुलाखतीदरम्यान विचारलेल्या साध्या प्रश्नाचा त्याला अर्थ समजला नाही आणि त्याने दिलेल्या उत्तरामुळे इंटरनेटवर एकच हशा पिकला.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओ क्लिपमध्ये एक महिला अँकर त्याला प्रश्न विचारताना म्हणते, "मी एक अमेरिकन क्रिकेट गर्ल आहे आणि तू कोण आहे?" प्रेक्षकांना खेळाडूची ओळख करुन देण्याच्या उद्देशाने तिने हा प्रश्न विचारला होता. यावर इफ्तिखार अहमद याला 'हू आर यू' (Who Are You) या प्रश्नाचा अर्थ 'हाऊ आर यू' (How Are You) असा समजला. त्यामुळे त्याने क्षणाचाही विलंब न करता थेट उत्तर दिले, "आय ऍम फाईन" म्हणजेच मी ठीक आहे. हा मजेशीर प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला आणि अवघ्या काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला.
जरी क्रिकेटपटूंच्या बाबतीत खेळाची मैदानवरील कामगिरी आणि कौशल्य भाषेपेक्षा जास्त महत्त्वाचे मानले जात असले, तरी अशा प्रकारच्या मजेशीर घटना नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात. इफ्तिखार अहमदच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे तर, त्याने पाकिस्तानसाठी क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅट्समध्ये प्रतिनिधित्व केले आहे. त्याने पाकिस्तानकडून (Pakistan) 4 कसोटी सामने, 28 एकदिवसीय सामने आणि 66 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
यादरम्यान त्याने अनुक्रमे 61, 614 आणि 998 धावा केल्या आहेत. खेळाव्यतिरिक्त तो त्याच्या खऱ्या वयावरुनही अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत आला. अधिकृत कागदपत्रांनुसार त्याचे वय 36 वर्षे सांगण्यात येते, ज्यावर अनेकदा चाहते शंका उपस्थित करतात. त्याने पाकिस्तानसाठी आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2024 मध्ये भारतीय संघाविरुद्ध टी-20 विश्वचषकात खेळला होता, ज्या रोमांचक सामन्यात भारताने 6 धावांनी विजय मिळवला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.