Pakistan Players Central Contract: "सॅलरी पाहिजे? मग आधी खेळायला शिका!", मोहसिन नक्वीने रोखले खेळाडूंचे सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट्स; काढला नवा फतवा

Pakistan Cricket Board Central Contracts Delayed: पाकिस्तानी क्रिकेटपटूंना त्यांचे नवीन सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट्स मिळण्यासाठी या महिन्याच्या अखेरीस पार पडणाऱ्या वनडे ट्राय सीरीज संपण्याची वाट पाहावी लागणार आहे.
Pakistan Cricket Board Central Contracts Delayed
mohsin naqviDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Pakistan Cricket Board Central Contracts Delayed: पाकिस्तानी क्रिकेटपटूंना त्यांचे नवीन सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट्स मिळण्यासाठी या महिन्याच्या अखेरीस पार पडणाऱ्या वनडे ट्राय सीरीज संपण्याची वाट पाहावी लागणार आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि राष्ट्रीय निवडकर्ते खेळाडूंवर अंतिम निर्णय घेण्यापूर्वी त्यांच्या कामगिरीचे सखोल मूल्यांकन करणार आहेत. आगामी काळात पाकिस्तानचा संघ 18 ते 31 ऑक्टोबर दरम्यान रावळपिंडी आणि लाहोर येथे श्रीलंका आणि इंग्लंडविरुद्ध ट्राय सीरीज खेळणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या विलंबाचे मुख्य कारण म्हणजे सर्व फॉरमॅटमधील राष्ट्रीय संघाचे मुख्य प्रशिक्षक माइक हसन आणि निवड समिती अंतिम निर्णयावर पोहोचण्यापूर्वी मायदेशात सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तसेच देशांतर्गत प्रथम श्रेणी सत्रामध्ये खेळाडूंच्या प्रत्यक्ष प्रदर्शनाचे बारकाईने निरीक्षण करणार आहेत. हसन आणि निवडकर्त्यांचे असे स्पष्ट मत आहे की, या महत्त्वाच्या सामन्यांमधील खेळाडूंच्या कामगिरीची पडताळणी केल्यानंतरच प्रत्येक खेळाडूला नवीन सेंट्रल कॉन्ट्रॅक्टच्या कोणत्या कॅटेगरीमध्ये स्थान द्यायचे, याचे योग्य चित्र स्पष्ट होईल.

Pakistan Cricket Board Central Contracts Delayed
Babar Azam Captaincy: 'कॅप्टन्सी सोड अन्...!', वसीम अकरमने बाबर आझमची काढली खरडपट्टी; इंग्लंडविरुद्धचा पराभव पाकिस्तानच्या जिव्हारी

यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) स्पष्ट केले होते की, नवीन सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट्स केवळ जुन्या ज्येष्ठतेच्या आधारावर दिले जाणार नसून ते पूर्णपणे फॉरमॅट स्पेसिफिक कॅटेगरीवर आधारित असेल. आता खेळाडूंना केवळ एकाच लाईनमध्ये न ठेवता कसोटी क्रिकेट फॉरमॅट, टी-20 फॉरमॅट आणि व्हाईट-बॉल फॉरमॅट अशा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये वर्गीकृत केले जाणार आहे. या निर्णयामुळे नवीन कॉन्ट्रॅक्ट्सच्या घोषणेमध्ये नोव्हेंबर महिन्यात श्रीलंकाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेची समाप्ती होईपर्यंत उशीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Pakistan Cricket Board Central Contracts Delayed
Babar Azam: देशानं सोडलं, पण परदेशानं स्वीकारलं! पाकीस्तानचा बाबर आझम आता ऑस्ट्रेलियात खेळणार टी-20 क्रिकेट

नवीन सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट्स जेव्हा केव्हा अधिकृतपणे जारी केले जातील, तेव्हा ते मागील तारखेपासून लागू केले जाण्याची दाट शक्यता आहे, कारण खेळाडूंचे मागील कॉन्ट्रॅक्ट 31 जुलै रोजीच समाप्त झाले आहे. सामान्य परिस्थितीत क्रिकेट बोर्ड दरवर्षी ऑगस्ट महिन्यातच नवीन कॉन्ट्रॅक्ट्सची घोषणा करते, परंतु यंदा कामगिरीच्या मूल्यांकनामुळे या प्रक्रियेला उशीर होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com