pakistan pm shehbaz sharif  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs PAK: "भारताविरुद्धचा सामना आम्ही खेळणार नाही!" हाय-होल्टेज मुकाबल्यावर पाक PM शाहबाज शरीफ यांचं मोठं वक्तव्य; पीसीबीला बसणार कोटींचा फटका?

PAK PM Shehbaz Sharif On T20 World Cup 2026: भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली 7 फेब्रुवारीपासून आयसीसी टी-20 वर्ल्ड कपचा थरार सुरु होत आहे.

Manish Jadhav

IND vs PAK Controversy : भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली 7 फेब्रुवारीपासून आयसीसी टी-20 वर्ल्ड कपचा थरार सुरु होत आहे. मात्र, स्पर्धेच्या सुरुवातीलाच पाकिस्तानच्या भूमिकेमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. पाकिस्तान सरकारने आपल्या संघाला 15 फेब्रुवारी रोजी भारताविरुद्ध होणाऱ्या हाय-व्होल्टेज सामन्यावर बहिष्कार टाकण्याचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणावर आता खुद्द पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पहिल्यांदाच भाष्य केले असून, त्यांनी आपल्या सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. शरीफ यांनी स्पष्ट केले की, पाकिस्तान आपल्या भूमिकेवर ठाम असून भारताविरुद्धचा सामना न खेळण्याचा निर्णय हा एक मोठा धोरणात्मक निर्णय आहे.

इस्लामाबादमध्ये झालेल्या कॅबिनेट बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना शाहबाज शरीफ म्हणाले की, क्रिकेटचे मैदान हे खेळासाठी असावे, राजकारणासाठी नाही. भारताने गेल्या अनेक वर्षांपासून क्रिकेटमध्ये राजकारण आणले आहे आणि म्हणूनच आम्ही 15 फेब्रुवारीचा सामना न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, पाकिस्तान सरकारने आपल्या संघाला श्रीलंकेत जाऊन विश्वचषक खेळण्याची परवानगी दिली असली, तरी केवळ भारताविरुद्धच्या सामन्यालाच विरोध दर्शवला आहे. पाकिस्तानचा (Pakistan) संघ सध्या श्रीलंकेत पोहोचला असून तिथे सराव करत आहे, मात्र या बहिष्कारामुळे क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे.

दुसरीकडे, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) या संदर्भात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, आयसीसीच्या नियमांनुसार, कोणत्याही संघाला जागतिक स्पर्धेत निवडक सामने खेळण्यास नकार देता येत नाही. जर पाकिस्तानने 15 फेब्रुवारीच्या सामन्यावर बहिष्कार टाकला, तर पीसीबीवर मोठा दंड आकारला जाऊ शकतो किंवा त्यांच्यावर निलंबनाची कारवाईही होऊ शकते.

अशा प्रकारच्या निर्णयामुळे पाकिस्तानी खेळाडूंच्या भविष्यावरही टांगती तलवार निर्माण झाली आहे. आता आयसीसी या प्रकरणात काय भूमिका घेते आणि पाकिस्तान शेवटच्या क्षणी आपला निर्णय बदलतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT