Football World Cup
Football World Cup Dainik Gomantak
क्रीडा

FIFA World Cup: फिफा वर्ल्ड कपमध्ये का होतेय पाकिस्तानची चर्चा? जाणून घ्या

दैनिक गोमन्तक

Football World Cup: राजकीय अस्थिरता आणि आर्थिक संकटाचा धोका असूनही पाकिस्तान बढाई मारण्यापासून परावृत्त झालेला नाही. वास्तविक, 20 नोव्हेंबरपासून कतारमध्ये सुरु झालेल्या FIFA विश्वचषक 2022 च्या सुरक्षेसाठी पाकिस्तानने PNS Tabuk हे जहाज पाठवले आहे.

दरम्यान, पाकिस्तानच्या या निर्णयावरुन सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या चर्चा सुरु आहेत, का नाही. कारण हा तोच पाकिस्तान (Pakistan) आहे, जिथे सध्या लाखो लोक अन्नासाठी वणवण भटकत आहेत. भीषण पुरामुळे झालेल्या विध्वंसानंतर लाखो लोक रस्त्यावर आले आहेत. मोठ्या प्रमाणात शेतकरी बेघर झाले आहेत.

दुसरीकडे, गेल्या महिन्यात पाकिस्तानात आलेल्या पुरामुळे 4 हजार चौरस किलोमीटरहून अधिक क्षेत्र पाण्यात बुडाले होते. त्याचा प्रभाव अजून संपलेला नाही. या भागातील शेतजमिनी ओसाड पडल्या आहेत. खाद्यपदार्थांच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत.

युनिसेफच्या म्हणण्यानुसार, पुरानंतर पाकिस्तानमध्ये उपाशीपोटी राहणाऱ्यांची संख्या 8.6 दशलक्षच्या पार गेली आहे. दरम्यान, पाकिस्तानमध्ये वेगळाच राजकीय भूकंप झाला असून, इम्रान खान (Imran Khan) सातत्याने सरकारवर हल्लाबोल करत आहेत. शिवाय, लष्करी प्रमुखांचाही कालावधीही संपणार आहे, मात्र पुढील लष्कर प्रमुखाचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. अशा स्थितीत पाकिस्तान इतरांच्या सुरक्षेसाठी जहाजे पाठवत आहे.

कतार बंदरावर पाकिस्तानी जहाज तैनात

मंगळवारी पाकिस्तानी नौदलाचे जहाज PNS Tabuk (PNS Tabuk) फुटबॉलच्या लढाईदरम्यान कतार (Qatar) बंदराजवळ सुरक्षेत तैनात करण्यात आले आहे. हे जहाज पाकिस्तानातून इथे पाठवण्यात आले आहे. फिफा विश्वचषकावर कोणत्याही शत्रूची नजर पडू नये यासाठी सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत. पाकिस्तानचे हे जहाजही या सुरक्षा स्तरावर तैनात आहे.

पाकिस्तानी जहाज कतारमध्ये का पोहोचले?

पाकिस्तान नौदलाच्या प्रवक्त्यानुसार, पीएनएस ताबुक जहाज 2022 विश्वचषकादरम्यान सागरी सुरक्षेसाठी कतार सरकारच्या समन्वयाने काम करेल. 2022 फिफा विश्वचषकाच्या यशस्वी समारोपात भूमिका बजावणाऱ्या पाकिस्तानी जहाजाचे एमिराती नौदलाच्या अधिकाऱ्यांनी उम्म अल हौल नौदल तळावर स्वागत केले.

मिळालेल्या माहितीनुसार, फुटबॉल चॅम्पियनशिप यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कतारच्या संरक्षण मंत्रालयाने मित्र देशांशी करार केला आहे, पाकिस्तानचे जहाज तैनात करणे हा या कराराचा एक भाग आहे. पाकिस्तान जहाज ताबुकच्या कमांडिंग ऑफिसरनेही यजमान नौदलाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली असून फिफा विश्वचषकासाठी सागरी सुरक्षेबाबत चर्चा केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: पल्लवी धेंपे, सिद्धेश नाईक मंत्री ढवळीकर यांच्याविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

गोवा निवडणूक काळात केजरीवालांचा सेव्हन स्टार हॉटेलमध्ये मुक्काम, कोणी दिले बिल? ED ची कोर्टात माहिती

Goa Petrol-Diesel Price: राज्यातील पेट्रोल-डिझेलच्या किमतीत किंचित बदल; वाचा सविस्तर दर

Jammu and Kashmir: कुलगाममध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लष्करचा टॉप कमांडर ठार; तीन दहशतवादीही ढेर

Goa Election 2024: दाबोळीत लोकशाहीचा खून, पोलिस संरक्षणात पैसे वाटल्याचा काँग्रेस उमेदवार विरियातोंचा आरोप

SCROLL FOR NEXT