FIFA World Cup: विजयाचा आनंद! Messiच्या अर्जेंटिनाला हरवल्याने सौदी सुलतानाकडून सुट्टी जाहीर

सौदी अरेबियाने अर्जेंटिनाला फिफा वर्ल्डकपमधील सामन्यात 2-1 गोलफरकाने पराभवाचा धक्का दिल्याने सौदीमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
Saudi Arabia Beats Argentina
Saudi Arabia Beats ArgentinaDainik Gomantak
Published on
Updated on

Saudi King Salman declared holiday: मंगळवारी फिफा वर्ल्डकप 2022 मध्ये सौदी अरेबियाने अर्जेटिनाला पराभवाचा धक्का देत सर्वांनाच चकीत केले. सौदीने अर्जेंटिनाला 2-1 गोलफरकाने पराभूत केले होते. या विजयाने सौदी अरेबियात उत्साहाची लाट पसरली असून आता तर खुद्द त्यांच्या सुलतानानेच बुधवारी राष्ट्रीय सुट्टीची घोषणा केली आहे.

सुलतान सलमान यांनी घोषित केल्याप्रमाणे बुधवारी सरकारी आणि खाजगी कर्मचाऱ्यांसह शाळांनाही सुट्टी घोषित केली आहे. खरंतर सध्या तिथे वार्षिक परिक्षा सुरू आहे. पण आता त्याची तारिखही या सुट्टीमुळे बदलण्यात येणार आहे.

Saudi Arabia Beats Argentina
Saudi Arabia Beats Argentina: मेस्सीच्या अर्जेंटिनाला सौदी अरेबियाचा 'धक्का'

याबरोबरच रॉयल कोर्टाचे सल्लागार आणि सौदी अरेबियाच्या (Saudi Arabia) जनरल एंटरटेनमेंट अथॉरिटीचे प्रमुख तुर्की अल-शेख यांनीही मंगळावारी ट्वीट करत जाहीर केले की शहरातील प्रमुख थीम पार्क आणि मनोरंजन केंद्रांवर प्रवेश शुल्क माफ केले जाईल.

मेस्सीच्या गोलनंतरही सौदीचे पुनरागमन

मंगळवारी झालेल्या सामन्यात अर्जेंटिनाने (Argentina) फर्स्ट हाफपर्यंत 1-0 अशी आघाडी घेतली होती. अर्जेंटिनाकडून स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने (Lionel Messi) 10 व्याच मिनिटाला नोंदवला होता. मात्र ही आघाडी अर्जेंटिनाला पुढे टिकवता आली नाही. सौदी अरेबियाकडून सालेह अलशेहरीनी आणि आणि सालेम अलदौसरी यांनी सेकंड हाफमध्ये 5 मिनिटाच्या अंतरात प्रत्येकी एक गोल नोंदवला. त्यामुळे सौदी अरेबियाने हा सामना जिंकून अर्जेंटिनाला धक्का दिला.

Saudi Arabia Beats Argentina
FIFA World Cup 2022: मेस्सी, रोनाल्डो ठरतील का स्पेशल प्लेयर? 'हे' संघ फिफा वर्ल्डकपचे प्रबळ दावेदार

विशेष म्हणजे या सामन्यापूर्वी अर्जेंटिना सलग 36 सामन्यांत अपराजित होते. त्यांनी अखेरचा पराभव 2019 मध्ये ब्राझीलविरुद्ध कोपा अमेरिका स्पर्धेत झाला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com