FIFA World Cup 2022: बेल्जियमविरुद्ध मैदानात उतरताच 'या' देशाची तब्बल 36 वर्षांची प्रतिक्षा संपणार!
FIFA World Cup: कतारमध्ये फिफा वर्ल्डकप 2022 ला दणक्यात सुरुवात झाली आहे. या वर्ल्डकपमध्ये कॅनडा संघ आहे, जो तब्बल 36 वर्षांनी खेळताना दिसणार आहे. 1886 पासून कॅनडा फिफा वर्ल्डकपमध्ये खेळण्यासाठी प्रतिक्षा करत होते. अखेर बुधवारी त्यांची ही प्रतिक्षा संपेल.
फिफा वर्ल्डकप 2022 साठी (FIFA World Cup 2022) कॅनडाचा ग्रुप एफ मध्ये समावेश आहे. या ग्रुपमध्ये कॅनडाला (Canada) पहिला सामना बुधवारी रात्री उशीरा बेल्जियमविरुद्ध (Belgium) खेळायचा आहे. यापूर्वी कॅनडाने 1986 साली वर्ल्डकपमध्ये सहभाग घेतला होता. पण त्यांना त्यावेळी एकही गोल करता आला नव्हता. त्या वर्ल्डकपमध्ये त्यांनी हंगेरी, फ्रान्स आणि सोव्हिएत युनियन विरुद्ध पराभव स्विकारला होता.
कॅनडाला यंदा वर्ल्डकपमध्ये बेल्जियमनंतर क्रोएशिया आणि मोरक्को यांचाही सामना करायचा आहे. हे दोन्ही संघही ग्रुप एफमध्ये सामील आहेत. तरी या ग्रुपमध्ये सध्यातरी बेल्जियम सर्वात मजबूत संघ दिसून येत आहे. ते सध्या फिफा क्रमवारीतही दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांच्या संघात केविन डी ब्रुईन, एडेन हजार्ड, रोमेलू लूकाकू असे अनुभवी खेळाडू आहेत.
तर, कॅनडा संघाबद्दल सांगायचे झाल्यास त्यांच्या संघातही जोनाथन डेव्हि़ड, अल्फान्सो डेविस आणि काईल लॉरिन यांसारखे चांगले खेळाडू सामील आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.