Captain Resigns Bismah Maroof Dainik Gomantak
क्रीडा

Pakistan क्रिकेटला मोठा धक्का, तडकाफडकी 'या' स्टार खेळाडूने सोडले कर्णधारपद

Manish Jadhav

Pakistan Cricket Board: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) बुधवारी, 1 मार्च 2023 रोजी एक मोठी घोषणा केली. नुकत्याच पार पडलेल्या T20 विश्वचषकात संघाच्या खराब कामगिरीनंतर या स्टार खेळाडूने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

आम्ही पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघाबद्दल बोलत आहोत, जी दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या T20 विश्वचषक 2023 मध्ये लीग स्टेजमधून बाहेर पडली होती.

बराच काळ या संघाची कर्णधार असलेल्या बिस्माह मारुफने आता संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, बोर्डाने शेअर केलेल्या माहितीत ती खेळाडू म्हणून निवडीसाठी उपलब्ध असेल, असे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, बिस्माह मारुफची सप्टेंबर 2017 मध्ये पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

तिच्या नेतृत्वाखाली, एकदिवसीय असो की टी-20, पाकिस्तानी संघाचे विजय-पराजय गुणोत्तर सर्वोत्कृष्ट आहे. तिच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने (Pakistan) 34 पैकी 16 एकदिवसीय सामने आणि 62 पैकी 27 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत.

अलीकडेच, आशिया चषक 2022 मध्येही तिच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाने भारतीय संघाचा पराभव केला होता. आपल्या निर्णयाबद्दल बोलताना, मारुफने देशाच्या संघाचे कर्णधारपद भूषवण्यास स्वतःला भाग्यवान असल्याचे सांगितले होते.

कर्णधारपद सोडल्यानंतर मारुफ काय म्हणाले?

संघाचे कर्णधारपद भूषवणे ही माझ्यासाठी अभिमानाची आणि सन्मानाची बाब आहे आणि अशा अप्रतिम संघासोबत खेळण्याची संधी मिळाल्याने मी खूप भाग्यवान आहे. अनेक चढ-उतारांसह हा एक अद्भुत प्रवास आहे, पण शेवटी, मला ही संधी दिल्याबद्दल मी माझ्या आल्लाहाचे आभार मानू इच्छिते, असे मारुफ म्हणाली.

तिच्या निर्णयाबद्दल, मारुफ पुढे म्हणाली की, ''आयसीसी महिला चॅम्पियनशिप सायकल नुकतीच सुरु झाली आहे आणि 2024 टी-20 विश्वचषकही पुढे आहे. अशा परिस्थितीत माझ्यासाठी कर्णधारपद सोडण्याची हीच योग्य वेळ होती. आता मला एक खेळाडू म्हणून माझ्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करायचे आहे आणि संघात माझी नवीन भूमिका साकारायची आहे.''

पीसीबीच्या (PCB) अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतलेल्या नजम सेठी यांनी बिस्माह मारुफला तिच्या निर्णयानंतर शुभेच्छा दिल्या.

सेठी म्हणाले की, "बिस्माह मारुफला मी शुभेच्छा देतो आणि राष्ट्रीय संघासाठी केलेल्या सेवांबद्दल तिचे आभार मानतो." लाखो मुलींसाठी ती प्रेरणा आहे आणि तिने सकारात्मक बदल घडवून आणला आहे. तिच्या समर्पण आणि कठोर परिश्रमाने तिने दाखवून दिले की स्त्रिया देखील त्यांच्या आवडीचे अनुसरण करु शकतात आणि त्यांच्या स्वप्नांचे अनुसरण करु शकतात. पीसीबी लवकरच नवीन कर्णधाराची घोषणा करणार आहे.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji News: मळ्यातील तळ्याचे सुशोभिकरण कधी? पणजीतील स्थानिकांचा सवाल

Panaji Smart City: पणजी मनपा इमारतीला 'ग्रीन सिग्नल' कधी? दोनदा पायाभरणी; मात्र कामाला सुरुवात नाही

Chimbel Flyover: Saint Francis Xavier अवशेष प्रदर्शनापूर्वी एक मार्ग होणार खुला ; चिंबल उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वाकडे

Indian Coast Guards: भारतीय तटरक्षक दलाचा जोरदार सराव! गोवा, महाराष्ट्र किनारपट्टीच्या सुरक्षाव्यवस्थेचे सर्वेक्षण

Hina Khan: तिसऱ्या स्टेजच्या कॅन्सरशी लढणाऱ्या हिनाला गोव्यात वृद्ध महिलेकडून मिळाली प्रेरणा; देवाकडे केली प्रार्थना Video

SCROLL FOR NEXT