Harmanpreet Kaur: 'आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतोय...' हरमनने 'शाळकरी मुलीची चूक' म्हणणाऱ्या दिग्गजाला सुनावले

इंग्लंडच्या माजी कर्णधाराने हरमनप्रीत कौरच्या रनआऊटला शाळकरी मुलीची चूक म्हटले होते, त्यावर आता तिनेच प्रत्युत्तर दिले आहे.
Harmanpreet Kaur
Harmanpreet KaurDainik Gomantak
Published on
Updated on

Harmanpreet Kaur: महिला टी20 वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध अवघ्या 5 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरची विकेट महत्त्वाची ठरली होती. ती चांगल्या लयीत असताना अर्धशतक केल्यानंतर धावबाद झाली होती.

दरम्यान, तिच्या धावबाद होण्याला शालेय मुलीसारखी चूक असल्याचे इंग्लंडचे माजी कर्णधार नासिर हुसेन यांनी म्हटले होत. त्यावर हरमनप्रीतने सामन्यानंतर प्रत्युत्तर दिले होते.

Harmanpreet Kaur
Harmanpreet Kaur: निराशा तर येणारच! ऐन मोक्याला रनआऊट झालेल्या हरमनचा राग अनावर, बॅट फेकतानाचा Video Viral

झाले असे की ऑस्ट्रेलियन महिला संघाने दिलेल्या 173 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना 15 व्या षटकात हरमनप्रीतने दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. पण दुसरी धाव घेत असताना क्रिजमध्ये पोहोचण्यापूर्वी तिची बॅट अडकली.

त्यानंतर ती क्रिजमध्ये पोहचण्यापूर्वी ऍश्ले गार्डनरच्या थ्रोवर यष्टीरक्षक एलिसा हेलीने स्टंपवरील बेल्स उडवल्या. त्यामुळे ती 52 धावांवर धावबाद झाली. ती बाद झाली तेव्हा भारताला 32 चेंडूत केवळ 40 धावांची गरज होती. मात्र, ती धावबाद झाल्यानंतर भारतीय संघ 20 षटकात 8 बाद 167 धावाच करू शकला.

दरम्यान, ती ज्याप्रकारे धावबाद झाली, त्याबद्दल समालोचन करत असताना नासिर हुसेन म्हणाले, तिने पहिली धाव हळू घेतली. ही एका शाळकरी मुलीने करावी, तशी चूक होती. याबद्दल सामन्यानंतर एका पत्रकाराने हरमनला प्रश्न विचारला.

Harmanpreet Kaur
Harmanpreet Kaur: मनातलं दु:ख अंजूम चोप्रासमोर आलं बाहेर, हरमनप्रीतचा ओक्साबोक्शी रडतानाचा Video आला समोर

त्यावर हरमनप्रीतने उत्तर दिले की 'त्यांनी असे म्हटले? ठिक आहे. ती त्यांची विचार करण्याची पद्धत आहे. मला माहित नाही, पण कधीतरी असे होते. मी क्रिकेटमध्ये असे बऱ्याचवेळा पाहिले आहे की फलंदाज अशाप्रकारे एकेरी धाव घेतात आणि कधीकधी बॅट तिथे अडकते. पण नक्कीच आम्ही त्या विकेटकडे आजचे दुर्दैव म्हणून पाहातो.'

'पण आम्हाला अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी अनेक गोष्टीत सुधारणा कराव्या लागणार आहेत. कारण जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल, तर तुम्हाला प्रत्येक विभागात चांगली कामगिरी करावी लागते. तेव्हाच तुमच्या उपांत्य सामन्यात आणि अंतिम सामन्यात पोहचण्याच्या संधी वाढतात.'

'मला वाटत नाही की ती एखाद्या शाळकरी मुलीसारखी चूक होती, कारण आम्ही पुरेशा परिपक्व आहोत. आम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत होतो आणि जर त्यांनी असे म्हटले आहे, तर ती त्यांची विचार करण्याची पद्धत आहे. पण वाटत नाही की ते तसे होते.'

दरम्यान, या सामन्यानंतर भारतीय महिला संघाचे या टी२० वर्ल्डकपमधील आव्हान संपुष्टात आले आहे. तसेच ऑस्ट्रेलिया महिला संघाने सलग सातव्यांदा अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com