India vs Pakistan Dainik Gomantak
क्रीडा

'...म्हणून भारतापेक्षा आम्ही वरचढ', IND vs PAK सामन्यापूर्वी बाबर आझमचं मोठं वक्तव्य

Babar Azam: भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने मोठे भाष्य केले आहे.

Pranali Kodre

Pakistan Captain Babar Azam on Match against India in Asia Cup 2023 Super Four:

आशिया चषक 2023 स्पर्धेत सुपर फोर फेरी सुरू झाली असून रविवारी (10 सप्टेंबर) भारत आणि पाकिस्तान सामना श्रीलंकेतील कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. पाकिस्तानचा हा सुपर फोर फेरीतील दुसरा सामना आहे, तर भारताचा पहिला सामना आहे.

या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटले आहे की पाकिस्तानचे बरेच खेळाडू नजीकच्या काळात श्रीलंकेत खेळले आहेत. त्यामुळे त्यांना चांगला अनुभव आहे. तसेच पाकिस्तानचे खेळाडू लंका प्रीमियर लीगमध्येही खेळले, त्याचबरोबर अफगाणिस्तानविरुद्ध वनडे मालिकाही तिथे खेळली. ज्याचा संघाला फायदा होऊ शकतो.

तो म्हणाला, 'आम्ही सातत्याने पाकिस्तान आणि श्रीलंकेत सामने खेळलो आगे. त्यामुळे तुम्ही म्हणू शकता की आम्ही भारताच्या काहीसे वरचढ आहोत.'

तो पुढे म्हणाला, 'आम्ही श्रीलंकेत गेल्या दोन महिन्यापासून खेळत आहोत. आम्ही कसोटी सामने खेळलो, आम्ही आफगाणिस्ताविरुद्धची मालिका खेळलो आणि नंतर लंका प्रीमियर लीगही. त्यामुळे असे म्हणता येईल की आमच्यासाठी हे फायदेशीर आहे.'

तसेच आशिया चषकादरम्यान पाकिस्तान आणि श्रीलंका असा प्रवास करावा लागल्याबद्दलही बाबर आझमने मत व्यक्त केले आहे. पाकिस्तानने आशिया चषकातील पहिला आणि सुपर फोरचा बांगलादेशविरुद्धचा सामना पाकिस्तानमध्ये खेळला, तर भारताविरुद्धचा साखळी फेरीतील सामना श्रीलंकेत खेळला होता. आता उर्वरित सामने श्रीलंकेतच होणार आहेत.

याबद्दल बाबर आझम म्हणाला, 'आम्हाला वेळापत्रक आणि किती प्रवास करावा लागेल, हे माहित होते. त्यामुळे आम्ही आमच्या खेळाडूंची कशी काळजी घेतो, हे महत्त्वाचे होते. आम्ही सर्वकाही योग्य पद्धतीने योजना आखल्या होत्या.'

आशिया चषकात आत्तापर्यंत पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी केली आहे. त्याबद्दल बाबरने कौतुक केले आहे. पण त्याचबरोबर मधल्या फळीत विकेट्स घेणे महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे.

तो म्हणाला, 'हो आम्हाला सुरुवाच चांगली मिळत आहे आणि आमची योजना नेहमीच मधल्या षटकांमध्येही चांगली गोलंदाजी करणे, हीच राहिली आहे. प्रयत्न प्रभावी संमिश्रण ठेवण्याचा आहे. आम्हाला मधल्या षटकांमध्ये विकेट्स घेण्याची गरज आहे, पण आम्हाला त्या मिळत नाहीत.'

'पण तुम्ही पाहू शकता की आम्ही शेवट चांगला करत आहोत. आमचे वेगवान गोलंदाज अखेरीस चांगली कामगिरी करत आहेत. ही सांघिक कामगिरी आहे. जर कोणी अपयशी ठरत असेल, तर दुसरा गोलंदाज जबाबदारी घेतो.'

याशिवाय भारताविरुद्ध सामन्यावेळी पावसाचीही भिती आहे. याबद्दल बाबर आझम म्हणाला, 'जे आमच्या नियंत्रणात आहे, त्यावर आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत. ज्यापद्धतीने सूर्य तळपत आहे, मला वाटत नाही की रविवारी फार पाऊस असेल. आम्ही शक्य तितका सराव करण्याचा प्रयत्न केला आहे.'

भारत आणि पाकिस्तान यांच्यात साखळी फेरीवेळी सामना झाला होता. मात्र, पहिल्या डावानंतर पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dance Viral Video: माझ्या डोईवरी भरली घागर रे... कोकणातल्या पोरांचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल, 'एक नंबर...'

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

America Firing: गोळीबाराने हादरले 'न्यूयॉर्क'! नाइट क्लबमध्ये बेछूट गोळीबार, 3 ठार, 8 जखमी

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

SCROLL FOR NEXT