IND vs PAK: केएल राहुल की इशान किशन, भारताची डोकेदुखी वाढली; कशी असणार पाकिस्तानविरुद्ध 'प्लेइंग-11'

Asia Cup 2023: रविवारी होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन मोठे बदल होऊ शकतात.
KL Rahul | Ishan Kishan
KL Rahul | Ishan KishanDainik Gomantak
Published on
Updated on

Asia Cup 2023 Super Four, India vs Pakistan, Playing XI:

आशिया चषक 2023 स्पर्धेत रविवारी (10 सप्टेंबर) भारतीय संघाला पाकिस्तानविरुद्ध सुपर फोर फेरीतील सामना खेळायचा आहे. पाकिस्तानचा हा सुपर फोर फेरीतील दुसरा सामना आहे, तर भारताचा पहिला सामना आहे.

भारत आणि पाकिस्तान सामना श्रीलंकेतील कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे.

महत्त्वाची गोष्ट अशी की सुपर फोरमधील सामने खेळण्यापूर्वी केएल राहुल भारतीय संघाशी जोडला गेला आहे. तो दुखापतीमुळे साखळी फेरीच्या दोन्ही सामन्यांसाठी उपलब्ध नव्हता. पण आता तो संघात परतला आहे. यामुळे मात्र, भारतीय संघव्यवस्थापनाची डोकेदुखी वाढली आहे.

KL Rahul | Ishan Kishan
'काय चेष्टा लावली?' IND vs PAK मॅचसाठी राखीव दिवस ठेवल्याने व्यंकटेश प्रसादने आयोजकांनाच धरलं धारेवर

जर केएल राहुलला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्याचा निर्णय झाला, तर त्याला कोणाच्या जागेवर खेळवणार. जर त्याला यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळवले, तर इशान किशनला आपली जागा गमवावी लागू शकते. तसेच जर फक्त फलंदाज म्हणून खेळवले, तर त्याला कोणाच्या जागेवर खेळवायचे याचे उत्तर संघव्यवस्थापनाला शोधावे लागणार आहे.

यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेतील तिन्ही सामन्यात अर्धशतके झळकावली आहेत, तसेच त्याने आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध साखळी फेरीत रद्द झालेल्या सामन्यातही 82 धावांची दबावात शानदार खेळी केली होती. त्यामुळे त्याचा फॉर्म पाहाता, त्याला वगळले जाण्याची शक्यता कमी आहे.

त्यामुळे कदाचीत केएल राहुलला त्याच्या पुनरागमासाठी प्रतिक्षा करावी लागण्याची दाट शक्यता आहे. केएल राहुलला आयपीएल २०२३ स्पर्धेत खेळताना दुखापत झाली होती. त्याच्या मांडीवर नंतर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर आता तो सावरला असून पुन्हा भारतीय संघाकडून खेळण्यास सज्ज झाला आहे.

KL Rahul | Ishan Kishan
IND vs PAK: पाकिस्तानविरुद्ध तब्बल 10 वर्षांनी विराटवर ओढावली 'अशी' नामुष्की

शमीलाही गमवावी लागणार जागा?

पाकिस्तानविरुद्ध साखळी फेरीतील सामन्यानंतर बुमराह त्याच्या मुलाच्या जन्मासाठी भारतात परतला होता. त्यामुळे तो नेपाळविरुद्धचा सामना खेळला नव्हता. पण सुपर फोरच्या सामन्यांपूर्वी तो पुन्हा भारतीय संघात परतला आहे.

त्यामुळे आता तोही रविवारी होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या सुपर फोर सामन्यासाठी उपलब्ध असणार आहे. अशा परिस्थितीत मोहम्मद शमीला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधील जागा गमवावी लागू शकते. तसेच बुमराहचे प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन होऊ शकते. या दोन बदलांव्यतिरिक्त भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता कमी आहे.

  • पाकिस्तानविरुद्धच्या सुपर फोर सामन्यासाठी भारताची संभावित प्लेइंग इलेव्हन - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन/केएल राहुल, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com