PAK vs SL Imam Ul Haq Saud Shakeel Out of Playing XI Dainik Gomantak
क्रीडा

PAK vs SL: ऐन मोक्यावर पाकिस्तानच्या प्लेइंग 11 मध्ये बदल, इमाम उल हक अन् सौद शकीलला झालं काय?

PAK vs SL Imam Ul Haq Saud Shakeel Out of Playing XI: बाबरने बुधवारी रात्री अचानक जाहीर केलेल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला.

Manish Jadhav

PAK vs SL Imam Ul Haq Saud Shakeel Out of Playing XI: पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात आज (गुरुवारी) कोलंबोमध्ये खेळल्या जात असलेल्या 'करा या मरो' सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) नाणेफेक जिंकून आश्चर्यकारक निर्णय घेतला.

प्रथम फलंदाजी करणार असल्याचे बाबरने सांगितले. मात्र, बाबरने बुधवारी रात्री अचानक जाहीर केलेल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला.

तो म्हणाला- इमाम उल हक आणि सौद शकील आज खेळत नाहीत. चला तर मग जाणून घेऊया दोन्ही खेळाडू का खेळणार नाहीत?

इमाम उल हक दुखापतग्रस्त

वास्तविक, इमाम-उल-हक दुखापतग्रस्त झाला आहे. त्याच्या जागी फखर जमानचे प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन झाले आहे. सौद शकीलला ताप आहे, तर त्याच्या जागी अब्दुल्ला शफीकचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. दुसरीकडे, जमान खानने वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. हारिस रौफने त्याला पदार्पणाची कॅप दिली.

तर श्रीलंकेचा (Sri Lanka) कर्णधार दसुन शनाका याने कुसल परेरा आणि प्रमोद मदुशनला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले आहे. नाणेफेक जिंकली असती तर काय केले असते, असे शनाकाला विचारले असता, त्याचे बाबरपेक्षा वेगळे मत होते.

तो म्हणाला- आम्हाला आधी गोलंदाजी करायची होती. सामन्यावर पावसाचे सावट आहे. मला वाटते की फिरकीपटूंना अधिक मदत मिळेल. आम्हाला याची खात्री आहे.

पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन:

1 फखर जमान, 2 अब्दुल्ला शफीक, 3 बाबर आझम (कर्णधार), 4 मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), 5 मोहम्मद हारिस, 6 इफ्तिखार अहमद, 7 शादाब खान, 8 मोहम्मद नवाज, 9 मोहम्मद वसीम, 10 शाहीन शाह आफ्रिदी, 11 जमान खान

श्रीलंकेची प्लेइंग इलेव्हन:

1 पाथुम निसांका, 2 कुसल परेरा, 3 कुसल मेंडिस (wk), 4 सदिरा समरविक्रमा, 5 चारिथ असलंका, 6 धनंजय डी सिल्वा, 7 दसुन शनाका (कर्णधार), 8 दुनिथ वेलालागे, 9 महिष तीक्षणा, 10 मिथाशा पथिराना

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT