PAK vs SL Spectator Chanting Garland Dainik Gomantak
क्रीडा

PAK vs SL: पठ्ठ्यानं एक सेकंदही सामना पाहिला नाही, पण असं काही केलं की...; पाहा Video

PAK vs SL Spectator Chanting Garland: भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने येऊ शकतात.

Manish Jadhav

PAK vs SL Spectator Chanting Garland: भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने येऊ शकतात. पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो येथे खेळल्या जात असलेल्या सुपर-4 सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवला तर 17 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना खेळवला जाईल.

भारताप्रमाणेच पाकिस्तान संघाचेही लाखो चाहते आहेत. त्यांना त्यांचा संघ अंतिम फेरीत पोहोचलेला पाहायचा आहे. यामुळेच अनेक चाहते प्रार्थना करत आहेत, पण एक चाहता असाही आहे, जो स्टेडियममध्ये जप करताना दिसला.

चाहत्याचं प्रेम

सुपर-4 च्या या सामन्यादरम्यान सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पाकिस्तानचा एक चाहता खुर्चीवर बसून जप करताना दिसत आहे.

पाकिस्तानचा स्टार इंफ्लूएन्सर मोमीन साकिब या व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत आहे - आशिया कप पाकिस्तानसाठी रोलर कोस्टर राईडसारखा होता. पाकिस्तान संघ फेव्हरेट आहे. सर्वांना वाटले की, पाकिस्तान जिंकेल, मात्र भारताविरुद्ध हरला.

गेममध्ये जय-पराजय असतो, पण आज श्रीलंकेला हरवले तर पाकिस्तान फायनलमध्ये जाईल, मात्र त्यांचा पराभव नक्की आहे. का विचारा बरं?

आमच्या चाहत्यांमुळे…हा मुलगा पाकिस्तानातून (Pakistan) आला आहे आणि त्याने एक सेकंदही सामना पाहिला नाही. तो फक्त अल्लाहाकडे प्रार्थना करत आहे, मी त्याला तोंड बंद ठेवण्यास सांगितले, तू मूर्ख आहेस.

मॅच बघ, पण त्याने काहीही रिऍक्शन दिली नाही. हे चाहत्यांचं प्रेम आहे. त्यामुळे आज हा पाकिस्तान जिंकणार आहे. साकिबचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

प्रेमात धोका दिलेल्या व्यक्तीला पुन्हा जवळ करावं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं रंजक उत्तर; म्हणले...

Viral Video: तुमच्या पाया पडतो! भाजप नेत्याचे स्मशानभूमीत अश्लील उद्योग, विवाहित महिलेसोबत रेड हँड सापडला

UNESCO List: युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झालेले शिवरायांचे 12 किल्ले कोणते? कोठे आहेत, इतिहास काय, कसे जाल? जाणून घ्या सर्व माहिती

Water Rafting Goa: पावसाळ्यात गोव्यात जाताय? सत्तरीत व्हाईट-वॉटर राफ्टिंगला झालीये सुरूवात; अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा

Marathi Schools Goa: 'पालकांमुळे बंद पडल्या गोव्यातील मराठी शाळा'; शिक्षणमंत्री प्रमोद सावंत

SCROLL FOR NEXT