Virat Kohli | Faf du Plessis Dainik Gomantak
क्रीडा

'सहन करणार नसाल तर...', भांडणानंतर RCB ड्रेसिंग रुमधील इनसाईड Video व्हायरल

LSG vs RCB सामन्यानंतर झालेल्या भांडणाबद्दल विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.

Pranali Kodre

Virat Kohli and Faf du Plessis react on on-field spat: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध 18 धावांनी विजय मिळवला. पण भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर झालेला हा सामना विराट कोहलीचे लखनऊचे खेळाडू आणि मार्गदर्शक गौतम गंभीर यांच्याबरोबर झालेल्या वादामुळे चांगलाच चर्चेत आला.

बेंगलोरने दिलेल्या 127 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना लखनऊकडून अमित मिश्रा आणि नवीन-उल-हक फलंदाजी करत होते. त्यावेळी बेंगलोरकडून क्षेत्ररक्षण करत असलेला विराटचे त्यांच्याशी शाब्दिक वाद झाले.

त्यानंतर हा वाद संपल्यानंतर आणखी वाढला. सामना झाल्यानंतरही विराट आणि नवीन यांच्यात हात मिळवत असताना वाद झाले. पुढे गंभीर आणि विराट यांच्यात कडाक्याची भांडणं झाली. त्यामुळे वातावरण चांगलंच तापलं होतं. पण विजय मिळवल्याने बेंगलोरच्या गोटात आनंद पसरलेला होता.

दरम्यान बेंगलोरने सामन्यानंतर ड्रेसिंग रुममधील वातावरणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये बेंगलोरचे खेळाडू त्यांचा विजय साजरा करताना दिसत आहेत. याच दरम्यान विराट आणि बेंगलोरचा कर्णधार फाफ डू प्लेसिस यांची या सामन्यात झालेल्या भांडणाबद्दलची प्रतिक्रियाही समोर आली आहे.

या व्हिडिओमध्ये दिसते की विराट म्हणत आहे की 'जर तुम्ही तसं वागू शकता, तर त्याचे परिणाम पण सहन करा, नाहीतर तसं वागूच नका.'

तसेच विराट म्हणाला की 'हा खूप चांगला विजय होता. हा पुढील मार्गाचा विचार केल्यास आमच्यासाठी खूप महत्त्वाचा विजय होता. हा खूप कारणांसाठी एक चांगला विजय होता. विशेषत: आम्ही धावांचा बचाव ज्या प्रकारे केला. मला वाटते की प्रत्येकाला विश्वास होता की आम्ही हा सामना जिंकू शकतो. शेवटी आम्ही विजयी संघ ठरलो, जे खूप छान आहे.'

'हा विजय चांगला होता आणि खरंतर आम्हाला प्रेक्षकांकडूनही मोठा पाठिंबा मिळाला, त्यामुळे अविश्वसनीय वाटत आहे. यातून हेच दिसते की आम्हाला संघ म्हणून किती पसंती दिली जात आहे आणि कसे लोक मैदानात येऊन आम्हाला पाठिंबा देत आहेत.'

तसेच फाफने विराटच्या आक्रमकपणाबद्दल भाष्य केले आहे. तो म्हणाला, 'ते विराटचे व्हर्जन आहे. जेव्हा तो सर्वोत्तम कामगिरी करत असतो, तेव्हा तुम्ही त्याला उत्साहात पाहाल. या सामन्याचा भाग होणे छान होते. माझे काम होते की मैदानात गोष्टी शांत राहातील आणि मला वाटते की मी ते चांगले केले.'

बेंगलोरचा विजय

या सामन्यात बेंगलोरने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 बाद 126 धावा केल्या होत्या. बेंगलोरकडून कर्णधार फाफ डू प्लेसिसने सर्वाधिक 44 धावांची खेळी केली. तसेच विराटने 31 धावा केल्या. बाकी कोणाला खास काही करता आले नाही. लखनऊकडून नवीनने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

तसेच 127 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊचा संघ 19.5 षटकात 108 धावांवरच सर्वबाद झाला. लखनऊकडून कृष्णप्पा गॉथमने सर्वाधिक 23 धावा केल्या. बाकी कोणाला 20 धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही. बेंगलोरकडून जौश हेजलवूड आणि कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT