IPL 2023: LSG vs RCB च्या हाय होल्टेज सामन्यात 'या' धाकडने मोडला लसिथ मलिंगाचा मोठा रेकॉर्ड!

LSG vs RCB: इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या सामन्यात सोमवारी (1 मे) लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आमनेसामने होते.
Lucknow Super Giants
Lucknow Super GiantsDainik Gomantak
Published on
Updated on

LSG vs RCB: इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या सामन्यात सोमवारी (1 मे) लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आमनेसामने होते.

आरसीबीच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्यांदा गोलंदाजी करताना लखनऊ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांनी आरसीबीला 126 धावांत रोखले. लखनऊच्या एका गोलंदाजाने मलिंगासारख्या अनुभवी खेळाडूचा मोठा विक्रम मोडीत काढला.

या भारतीय दिग्गजाचा मोठा रेकॉर्ड

भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला फिरकी गोलंदाज 40 वर्षीय अमित मिश्राने आयपीएलमध्ये एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

आयपीएल (IPL) 2023 मध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळणाऱ्या अमित मिश्राने लसिथ मलिंगाचा मोठा विक्रम मोडीत काढत आपल्या नावावर ही कामगिरी केली.

Lucknow Super Giants
IPL 2023: लखनऊला जबर धक्का! कॅप्टन KL Rahul ला जावे लागले मैदानाबाहेर, अथियाची रि‍ऍक्शन व्हायरल

वास्तविक, अमित मिश्रा आता आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे.

आरसीबीची पहिली विकेट घेताच त्याने हे यश आपल्या नावावर केले. त्याने एका फटक्यात लसिथ मलिंगा (Lasith Malinga), रविचंद्रन अश्विन आणि पियुष चावला यांचा 170 बळींचा विक्रम मागे टाकला. या सामन्यात अमित मिश्राने 2 बळी घेतले. आता त्याच्या नावावर 172 आयपीएल विकेट आहेत.

आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज

आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये ड्वेन ब्राव्हो अव्वल आहे. या स्पर्धेत त्याने 183 विकेट्स घेतल्या आहेत.

तो बराच काळ चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला. यानंतर चालू हंगामात युजवेंद्र चहल राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे.

त्याच्या नावावर 178 विकेट्स आहेत, तर अमित मिश्रा 172 विकेट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये 160 सामने खेळले आहेत. त्याचा सर्वोत्तम स्पेल म्हणजे 17 धावांत 5 बळी.

Lucknow Super Giants
IPL 2023: पंजाबविरुद्ध का झाला पराभव? CSK कॅप्टन धोनीने स्पष्टच सांगितले की...

RCB ने 126 धावा केल्या

पहिल्यांदा फलंदाजी करताना आरसीबीने 126 धावा केल्या, विराट कोहली (33) आणि फाफ डू प्लेसिस (44) यांनी डाव सावरला. दिनेश कार्तिकने 11 चेंडूत 16 धावा केल्या.

याशिवाय, संघाच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. लखनऊच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. नवीन-उल-हकने सर्वाधिक 3 बळी घेतले. रवी बिश्नोई-अमित मिश्राने 2-2, तर कृष्णप्पा गौथमने 1 बळी घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com