ODI World Cup 2027 schedule Announcement Dainik Gomantak
क्रीडा

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

ODI World Cup 2027 schedule Announcement: एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठ्या स्पर्धांपैकी एक असलेल्या ODI World Cup 2027 ची तयारी आता वेगाने सुरू झाली आहे.

Sameer Amunekar

एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठ्या स्पर्धांपैकी एक असलेल्या ODI World Cup 2027 ची तयारी आता वेगाने सुरू झाली आहे. पुढील वर्षी दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणाऱ्या या स्पर्धेच्या वेळापत्रकाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 1 ऑक्टोबर 2026 रोजी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे विश्वचषकाच्या वेळापत्रकाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

ICC आणि क्रिकेट साउथ आफ्रिका (CSA) यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, विश्वचषक सुरू होण्याच्या जवळपास वर्षभर आधीच वेळापत्रक जाहीर होणार असल्याने क्रिकेट चाहत्यांना सामने, संघ आणि संभाव्य ठिकाणांबाबत अधिक स्पष्ट चित्र मिळणार आहे.

2 ऑक्टोबर 2027 पासून स्पर्धेला सुरुवात?

2027 च्या वनडे विश्वचषकाची सुरुवात 2 ऑक्टोबर 2027 रोजी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अंतिम सामना 21 नोव्हेंबर 2027 रोजी खेळवला जाऊ शकतो. त्यामुळे जवळपास दीड महिन्याच्या कालावधीत जगभरातील क्रिकेट चाहत्यांना वनडे क्रिकेटचा थरार अनुभवता येणार आहे.

यजमान देशांमध्ये दक्षिण आफ्रिकेसोबत झिम्बाब्वे आणि नामिबियाचाही समावेश आहे. त्यामुळे या तिन्ही देशांमध्ये विश्वचषकातील सामने खेळवले जाणार आहेत.

14 संघांमध्ये होणार विश्वचषकाची लढत

या स्पर्धेत एकूण 14 संघ सहभागी होणार आहेत. त्यापैकी काही संघांना थेट प्रवेश मिळणार असून उर्वरित संघांना पात्रता फेरीतून मुख्य स्पर्धेत स्थान मिळवावे लागणार आहे.

यजमान दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांना थेट स्थान मिळणार आहे. याशिवाय ICC वनडे क्रमवारीच्या आधारे आणखी संघांची निवड केली जाणार आहे. उपलब्ध माहितीनुसार भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश हे संघ क्रमवारीच्या माध्यमातून मुख्य स्पर्धेत पोहोचण्याच्या स्थितीत आहेत.

वेस्ट इंडिजसह चार संघांना क्वालिफायरचा मार्ग

यजमानपदामुळे दक्षिण आफ्रिकेला थेट प्रवेश मिळाल्याने पात्रतेच्या समीकरणात बदल झाला आहे. त्यामुळे बांगलादेशलाही थेट प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, वेस्ट इंडिजला मात्र पात्रता स्पर्धेचा मार्ग पार करावा लागणार आहे.

एकूण चार संघ पात्रता स्पर्धेतून मुख्य विश्वचषकात प्रवेश करतील. वेळापत्रक जाहीर होताना या संघांना त्यांच्या अंतिम नावांऐवजी तात्पुरते क्वालिफायर-1, क्वालिफायर-2, क्वालिफायर-3 आणि क्वालिफायर-4 अशा स्वरूपात दाखवले जाण्याची शक्यता आहे.

1 ऑक्टोबरपासून तिकीट बॅलेटसाठी नोंदणी

विश्वचषकाच्या वेळापत्रकासोबतच चाहत्यांसाठी तिकीट प्रक्रियेचीही सुरुवात होणार आहे. 1 ऑक्टोबरपासून तिकीट बॅलेटसाठी नोंदणी सुरू होईल. मात्र, याचा अर्थ त्या दिवशी तिकिटांची थेट विक्री सुरू होईल असा नाही.

चाहत्यांना प्रथम बॅलेट प्रक्रियेत आपली नोंदणी करावी लागेल. त्यानंतर ठरलेल्या प्रक्रियेनुसार तिकिटांचे वाटप केले जाणार आहे. त्यामुळे विश्वचषकाचे सामने प्रत्यक्ष स्टेडियममध्ये पाहू इच्छिणाऱ्या चाहत्यांसाठी 1 ऑक्टोबर ही तारीख महत्त्वाची ठरणार आहे.

विश्वचषकाचा फॉर्मेट असेल वेगळा

2027 च्या विश्वचषकाचा फॉर्मेटही विशेष चर्चेत आहे. पारंपरिक गट आणि बाद फेरीच्या पद्धतीपेक्षा यावेळी स्पर्धेची रचना अनेक टप्प्यांमध्ये करण्यात आली आहे.

पहिल्या टप्प्यात पात्र ठरलेल्या 14 संघांपैकी क्रमवारीतील शेवटच्या तीन संघांमध्ये सुपर सीरीज खेळवली जाणार आहे. या तीन संघांमध्ये राउंड-रॉबिन पद्धतीने सामने होतील. त्यातून सर्वोत्तम कामगिरी करणारा संघ पुढील टप्प्यात प्रवेश करेल.

12 संघ दोन गटांमध्ये विभागले जाणार

यानंतर मुख्य स्पर्धेतील 12 संघ दोन गटांमध्ये विभागले जातील. प्रत्येक गटात सहा संघ असतील. या टप्प्यात एकूण 30 सामने खेळवले जाण्याची शक्यता आहे.

प्रत्येक गटातील अव्वल तीन संघ पुढील फेरीसाठी पात्र ठरतील. याशिवाय दोन्ही गटांतील उर्वरित संघांपैकी सर्वाधिक चांगली कामगिरी करणाऱ्या एका संघालाही पुढील फेरीत प्रवेश मिळेल.

सुपर-7 मध्ये 21 सामने, मग सेमीफायनल

यानंतर स्पर्धेचा सुपर-7 टप्पा सुरू होईल. या फेरीत सात संघ एकमेकांविरुद्ध राउंड-रॉबिन पद्धतीने खेळतील. या टप्प्यात एकूण 21 सामने होतील.

सुपर-7 मधील गुणतालिकेतील अव्वल चार संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील. पहिल्या क्रमांकावरील संघाचा सामना चौथ्या क्रमांकाच्या संघाशी, तर दुसऱ्या क्रमांकावरील संघाचा सामना तिसऱ्या क्रमांकाच्या संघाशी होईल. दोन्ही सेमीफायनलमधील विजेते अंतिम सामन्यात आमनेसामने येतील.

अशाप्रकारे 1 ऑक्टोबरला होणाऱ्या वेळापत्रकाच्या घोषणेनंतर 2027 वनडे विश्वचषकाचे संपूर्ण चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. कोणत्या संघाचे सामने कोणत्या शहरात होतील, भारत-पाकिस्तानसारख्या महत्त्वाच्या लढतींच्या तारखा काय असतील आणि तिकीट प्रक्रियेचे पुढील टप्पे कसे असतील, याकडे आता क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

Viral Video: किंग कोब्राला चक्क किस करण्याचा प्रयत्न; पुढच्या क्षणी जे झालं ते पाहून लोकांची धाकधूक वाढली, पाहा व्हायरल व्हिडिओ

Election Commission: केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारवाईला आम्ही कंटाळलो! 'गोवा काँग्रेस पक्ष' नोंदणी प्रक्रियेसंदर्भात कोर्ट नाराज

VIDEO: वकिलाची गाडी अडवून मारहाण अन् शिवीगाळ, आमदार पुत्राची गुंडगिरी; तक्रारीनंतरही FIR नाही, पोलिसांच्या भूमिकेवर सवाल!

Myanmar Airstrike: म्यानमारमध्ये मृत्यूचं भयानक तांडव! गजबजलेल्या बाजारात अचानक हवाई हल्ला; 49 जणांचा मृत्यू; 58 जखमी, थरारक VIDEO समोर

SCROLL FOR NEXT