Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Goa postmen daily wage: दहा-पंधरा वर्षे ‘आऊटसाईडर पोस्टमन’ म्हणून काम करणाऱ्या रोजंदारीवरील पोस्टमनना नोकरीत कायम करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रयत्न करावेत, अशी विनंती करणारे निवेदन मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांना सादर करण्यात आले आहे.
Goa Postmen
Goa PostmenDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

वास्को: गेली दहा-पंधरा वर्षे ‘आऊटसाईडर पोस्टमन’ म्हणून काम करणाऱ्या रोजंदारीवरील पोस्टमनना नोकरीत कायम करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रयत्न करावेत, अशी विनंती करणारे निवेदन मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांना सादर करण्यात आले आहे.

अनेक वर्षांचा अनुभव असूनही टपाल खात्यामध्ये कायमस्वरूपी भरतीची संधी अद्याप मिळत नसल्याबद्दल स्थानिक पोस्टमननी नाराजी व्यक्त केली आहे.

टपालसेवेबाबत गोव्याचा समावेश महाराष्ट्र सर्कलमध्ये असल्याने गोव्यात येणारे बहुतांश पोस्टमन महाराष्ट्रातील असतात. त्यापैकी काहीजण येथे एक-दोन वर्षे पोस्टमन म्हणून काम करतात. त्यानंतर ते आपल्या मूळ गावी बदल्या घेऊन जातात. त्यामुळे त्या भागात पोस्टमन म्हणून काम करण्यासाठी गोव्यातील युवक-युवतींना ‘आऊटसाईडर पोस्टमन’ या शीर्षकाखाली रोजंदारीवर घेतले जाते.

Goa Postmen
South Goa Crime Cases: दक्षिणेत 8 महिन्यांत 525 गुन्ह्यांचा छडा, खुनाच्या सर्व सहा प्रकरणांची उकल

आऊटसाईटर पोस्टमन म्हणून काम पाहणारे काहीजण तर पंधरा वर्षापेक्षा अधिक वर्षे रोजंदारीवर काम करीत आहेत. आता दुसरीकडे नोकरी मिळण्याची शक्यता नाही. नोकरीचे वयही उलटून गेले आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर नोकरीसंबंधी प्रश्नचिन्ह असते. आमच्याकडे पोस्टमन म्हणून काही वर्षांचा अनुभव आहे.

Goa Postmen
Goa Housing Board: गृहनिर्माणकडून साखळी, थिवीत भूखंडांचा ई-लिलाव; निविदा जारी, 19 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची सूचना

त्यामुळे सेवेची वर्षे व अनुभव यांचा विचार भरतीप्रसंगी करण्याची गरज या उमेदवारांनी व्यक्त केली आहे. ‘आऊटसाईटर पोस्टमन’ रोजंदारीवर काम करीत असल्याने त्यांना इतर लाभही मिळत नाहीत. त्यामुळे भविष्यात काय, असा प्रश्न त्यांना नेहमीच सतावत असतो. याप्रश्‍नी लोकप्रतिनिधींनी तोडगा काढावा, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे.

नोकरी जाण्याची धास्ती कायम

जोपर्यंत महाराष्ट्र सर्कलमधून गोव्यात नवीन पोस्टमन येत नाहीत, तोपर्यंत स्थानिक युवकांना ‘आऊटसाईटर पोस्टमन’ म्हणून काम दिले जाते. त्यामुळे या आऊटसाईटर पोस्टमनना रोजंदारीवरील कामाचीही खात्री नसते. कधी कायमस्वरूपी पोस्टमन महाराष्ट्रातून येईल आणि आपल्याला रोजंदारीवरून दूर केले जाईल, याबद्दल त्यांच्या मनात सतत भीती असते.

गोव्यातील उमेदवारांसाठी स्वतंत्र सर्कल हवे!

गोव्यातील टपाल सेवा महाराष्ट्र सर्कलमध्ये समाविष्ट असल्याने गोव्यातील युवक-युवतींना संधी मिळत नाही. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींनी गोव्यासाठी स्वतंत्र सर्कलची मागणी केल्यास गोव्यातील युवक-युवतींना रोजगाराची संधी मिळेल, असे जाणकार सांगतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com