World Cup 2023 Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: एकाच झटक्यात 'हे' 3 संघ वर्ल्डकपमधून आऊट! एक भारताचा शेजारी देश

ICC ODI World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक (ODI WC-2023) यावर्षी भारताच्या यजमानपदावर खेळवला जाणार आहे.

Manish Jadhav

ICC ODI World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक (ODI WC-2023) यावर्षी भारताच्या यजमानपदावर खेळवला जाणार आहे. टीम इंडिया ट्रॉफी जिंकण्याचा मोठा दावेदार आहे, ज्याचे नेतृत्व धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्मा करणार आहे. या ICC स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत, मात्र त्याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे.

रोहितवर मोठी जबाबदारी

एकदिवसीय विश्वचषक यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये खेळवला जाणार आहे, ज्याचे यजमानपद भारताकडे आहे. टीम इंडियाला (Team India) 12 वर्षांपासून ही स्पर्धा जिंकता आलेली नाही. त्याने 2011 मध्ये अंतिम फेरीत श्रीलंकेचा पराभव करुन एकदिवसीय विश्व चॅम्पियन होण्याचा मान मिळवला.

त्यावेळी संघाचे कर्णधारपद अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनीकडे होते. आता भारताच्या अब्जावधी चाहत्यांना आनंदोत्सव साजरा करण्याची मोठी संधी देण्याची जबाबदारी रोहित शर्मावर असेल.

10 संघ सहभागी होणार आहेत

एकदिवसीय विश्वचषकाच्या आगामी हंगामात 10 संघ सहभागी होतील. त्याचे 8 संघ निश्चित करण्यात आले आहेत, ज्यात यजमान भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान, अफगाणिस्तान, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांचा समावेश आहे. उर्वरित 2 संघांसाठी पात्रता सामने खेळवले जात आहेत.

हे 3 संघ बाद झाले

विश्वचषक पात्रता फेरीचा संपूर्ण निकाल येणे बाकी आहे, परंतु 3 संघ बाहेर पडले आहेत. यामध्ये भारताचा शेजारी नेपाळ आणि अमेरिका (यूएसए) यांचा समावेश आहे. याशिवाय, संयुक्त अरब अमिराती (यूएई) संघही आयसीसी स्पर्धेच्या मुख्य गटासाठी पात्रता गमावू शकला.

नेपाळने (Nepal) 4 पैकी 3 सामने गमावले तर यूएसएने तिन्ही सामने गमावले आहेत. युएईचा संघही तिन्ही सामने गमावल्यानंतर ब गटातून बाहेर पडला आहे. पात्रता फेरीत 10 संघ सहभागी होत आहेत. यापैकी 6 संघ सुपर-6 साठी पात्र ठरतील, त्यानंतर 2 संघांना मुख्य गटात स्थान मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: कळंगुट येथील चोरीप्रकरणी एकास अटक, 3 लाखांचा मुद्देमालही जप्त!

Kartik Aaryan: ना गाजावाजा न कसाला धिंगाणा; कार्तिकने गोव्यात शांततेत साजरा केला वाढदिवस पाहा Photo, Video

Winter Skin Care Tips: हिवाळ्यात चहा, कॉफीसारखे गरम पेय का टाळावेत?

त्या 'मॅडम'ला पकडून देण्याचा गोमंतकीयांनी निर्धार केलाय! Cash For Job प्रकरणावरुन सरदेसाई पुन्हा बरसले

Ranbir Kapoor In IFFI: 'मला आजही त्या गोष्टीची लाज वाटते'; इफ्फीच्या मास्टरक्लामध्ये रणबीर केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT