ODI Cricket World Cup 2023|Indian Economy|Share Market Dainik Gomantak
क्रीडा

Cricket World Cup 2023 दरम्यान पडणार पैशांचा पाऊस; 45 दिवसांत होणार 22 हजार कोटींची उलाढाल, शेअर बाजारही उसळणार

Cricket World Cup 2023: अहवालानुसार, विश्वचषकातून विदेशी पर्यटकांकडून 600 कोटी रुपयांची कमाई होऊ शकते. तर देशी पर्यटकांकडून 250 कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित आहे.

Ashutosh Masgaunde

ODI Cricket World Cup is expected to generate business of Rs 18,000 crore to Rs 22,000 crore in the India: यंदाचा एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक आजपासून इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने सुरू होणार आहे. या स्पर्धेतून देशात 18,000 कोटी ते 22,000 कोटी रुपयांचा व्यवसाय अपेक्षित आहे.

या कालावधीत, रोजंदारी कामगार आणि व्यवस्थापनाशी संबंधित लोक 1,000 कोटी रुपयांपर्यंत कमवू शकतात. अन्न वितरण आणि स्क्रीनिंगचा अंदाजे व्यवसाय 5,000 कोटी रुपये असेल.

बँक ऑफ बडोदाच्या अहवालानुसार, सामन्यांच्या तिकिटांच्या विक्रीतून 2,200 कोटी रुपये मिळतील. टीव्ही प्रायोजकत्व म्हणून जास्तीत जास्त रक्कम 10,500 ते 12,200 कोटी रुपये असू शकते, तर संघांवर 250 कोटी रुपये खर्च केले जाऊ शकतात.

अहवालानुसार, विश्वचषकातून विदेशी पर्यटकांकडून 600 कोटी रुपयांची कमाई होऊ शकते. तर देशी पर्यटकांकडून 250 कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित आहे.

अहवालानुसार, मर्चेंडाइज व्यवसाय 200 कोटी रुपये आणि प्रेक्षकांचा खर्च 500 कोटी रुपये असू शकतो.

देशातील क्रिकेटची क्रेझ प्रत्येक वर्ग आणि वयोगटातील लोकांना आकर्षित करते. त्यामुळे चालू आर्थिक वर्षाच्या जीडीपीवरही सकारात्मक परिणाम होईल.

2019 मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकाचा परिणाम तेथील जीडीपीवर दिसून आला. सेवा, आदरातिथ्य आणि वाहतूक क्षेत्रांना या विश्वचषकाचा सर्वाधिक फायदा होईल.

आकडेवारीनुसार, गेल्या वेळी 55 कोटी क्रिकेट चाहत्यांनी सामना पाहिला होता. यावेळी टीव्ही, ओटीटी आणि इतर प्लॅटफॉर्मवरून सामना पाहणाऱ्यांकडून अधिक अपेक्षा आहेत. लोकांचा मर्चेंडाइज खरेदी करण्यातही रस राहील.

2011 मध्ये भारताने विश्वचषक जिंकला आणि त्यानंतर पहिल्यांदाच ही स्पर्धा भारतात होत आहे. भारत चौथ्यांदा विश्वचषकाचे यजमानपद भूषवत आहे. हा सामना पाहण्यासाठी जवळपास 25 लाख क्रिकेटप्रेमी स्टेडियमवर पोहोचणार आहेत.

शेअर बाजारही तेजीत

आजपासून देशात एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक सुरू होत आहे. ज्या शहरांमध्ये विश्वचषकाचे सामने होणार आहेत, तेथे हॉटेल्सचे बुकिंग झपाट्याने होत असून बुकिंगसोबत हॉटेलचे भाडेही वाढत आहे. दुसरीकडे, क्रिकेट सामन्यांच्या प्रसारणासाठी जाहिरातीचे दरही वाढत आहेत.

दोन्ही परिस्थितींचा परिणाम म्हणजे हॉटेल आणि मीडिया क्षेत्रातील शेअर्स वाढत आहेत. वाढत्या खोलीचे भाडे आणि जाहिरातींचे वाढते दर यामुळे हॉटेल्स आणि मीडियाच्या शेअर्समध्ये वाढ दिसून येत आहे.

भारतात क्रिकेटला खूप मोठी फॅन फॉलोविंग आहे. यामुळे देशातील मीडिया, हॉटेल आणि हॉस्पिटॅलिटी, रेस्टॉरंट्स यांसारख्या उपभोग आणि विश्रांतीशी संबंधित स्टॉक्सना चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.

दरम्यान क्रिकेटच्या महाकुंभासोबत सध्या भारतात सणासुदीचा काळ आहे. क्रिकेट आणि फेस्टिव्हल सीझन यांच्या सांगडामुळे बाजाराला दुहेरी चालना मिळू शकते. स्पर्धेचा फायदा अपेक्षित असलेल्या इतर स्टॉकमध्ये एअरलाइन्स, केबल, इंटरनेट सेवा प्रदाता कंपन्यांचा समावेश असू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT