ENG vs NZ: न्यूझीलंड-इंग्लंड सामन्याने उडणार वर्ल्डकपचा बार, जाणून घ्या कशी असू शकते दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन

Cricket World Cup: गेल्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाचे विजेत इंग्लंड आणि उपविजेते न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने यंदाच्या विश्वचषक स्पर्धेचा बार उडणार आहे. यावेळी न्यूझीलंड 2019 च्या पराभवाचा वचपा काढण्याच्या दृष्टीने मैदानात उतरेल.
Eng vs NZ Playing Eleven Prediction|Cricket World Cup 2023
Eng vs NZ Playing Eleven Prediction|Cricket World Cup 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

ODI Cricket World Cup Eng vs NZ Playing Eleven Prediction:

विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा संघ अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर उतरेल तेव्हा गतविजेत्या इंग्लंडकडून बदला घेण्याकडे त्यांचे लक्ष असेल. कारण 2019 च्या विश्वचषकाचा अंतिम सामना दोन्ही संघांमध्ये खेळला गेला होता.

सामना सुपर ओव्हरमध्येही बरोबरीत सुटल्यानंतर चौकारांच्या आधारे इंग्लंडने विजेतेपद पटकावले. न्यूझीलंडचे खेळाडू अजूनही तो पराभव विसरू शकलेले नाहीत. दुसरीकडे, विजेतेपदाच्या दावेदार इंग्लंडला स्पर्धेची सुरुवात विजयाने करायची आहे.

यंदा इंग्लंडचे कर्णधारपद जॉस बटलरच्या हाती आहे. 2019 मध्ये तो खेळाडू म्हणून संघात होता. त्यावेळी इऑन मॉर्गन इंग्लंडचा कर्णधार होता.

दुसरीकडे केन विल्यमसन न्यूझीलंडची कमान सांभाळत आहे. गेल्या विश्वचषकात त्याने संघाचे नेतृत्व केले होते. मात्र, विल्यमसन पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने इंग्लंडविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात खेळू शकणार नाही.

विल्यमसनला IPL 2023 च्या पहिल्या सामन्यात दुखापत झाली होती. विल्यमसनच्या जागी टॉम लॅथम पहिल्या सामन्यात न्यूझीलंडची कमान सांभाळेल.

विल्यमसनच्या जागी भारतीय वंशाच्या खेळाडूला संधी?

विल्यमसनच्या जागी रचिन रवींद्रला संधी दिली जाऊ शकते. रचिनने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सराव सामन्यात ९७ धावांची इनिंग खेळली होती. रचिन फिरकी गोलंदाजीही करू शकतो. त्यामुळे जेम्स नीशमपेक्षा त्याला प्राधान्य दिले जाऊ शकते. अनुभवी वेगवान गोलंदाज टीम साऊदीचेही दुखापतीमुळे खेळणे साशंक आहे.

फलंदाजीच्या फळीत न्यूझीलंडची जबाबदारी डेव्हॉन कॉनवे, विल यंग आणि डॅरिल मिशेल यांच्यावर असेल.

हंगामी कर्णधार टॉम लॅथम आणि ग्लेन फिलिप्सकडे मधल्या फळीत मोठी जबाबदारी असणार आहे. खालच्या फळीत जेम्स नीशम किंवा रचिन रवींद्रसह मिचेल सँटनर असतील. मॅट हेन्री, ट्रेंट बोल्ट आणि लॉकी फर्ग्युसन वेगवान गोलंदाजीची जबाबदारी सांभाळतील. सँटनरसोबतच ईश सोधी फिरकीपटू म्हणून असेल.

स्टोक्समुळे इंग्लंड चिंतेत

दुसरीकडे इंग्लिश कॅम्पलाही दुखापतींनी ग्रासले आहे. कर्णधार जोस बटलरने सांगितले की, स्टोक्स हिपच्या समस्येने त्रस्त असून तो खेळेल हे निश्चित नाही.

स्टोक्सने अलीकडेच न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकावले होते. तो गोलंदाजी करत नसला तरी त्याचा फलंदाज म्हणून संघाला खूप उपयोग होऊ शकतो. स्टोक्स न खेळणे हा इंग्लंडसाठी मोठा धक्का असेल.

स्टोक्सशिवाय इंग्लंड संघात अनेक अष्टपैलू खेळाडू आहेत. लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम कुरन आणि ख्रिस वोक्स बॉल आणि बॅटने योगदान देण्यास सक्षम आहेत.

फलंदाजांमध्ये जॉनी बेअरस्टो, डेव्हिड मलान, जोस रूट, हॅरी ब्रूक आणि कॅप्टन बटलर यांचा समावेश आहे.

आदिल रशीद आणि मार्क वुड हे स्पेशालिस्ट गोलंदाज असतील. जरी संघाने रीस टोपली आणि डेव्हिड विली यांना प्लेइंग-11 मध्ये सहभागी नाही केले तरी त्याचा फारसा परिणाम होणार नाही.

Eng vs NZ Playing Eleven Prediction|Cricket World Cup 2023
दहा कर्णधार, एक लक्ष्य! World Cup 2023 स्पर्धेचे वाजले बिगूल, पाहा व्हिडिओ

दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग-11

इंग्लंड: जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स/हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार, विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम कुरन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड.

न्यूझीलंड: डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार, विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, जेम्स नीशम/रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, इश सोधी, मॅट हेन्री, ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन.

Eng vs NZ Playing Eleven Prediction|Cricket World Cup 2023
Shikhar Dhawan Divorce: पत्नीने केलेल्या क्रूरतेच्या आधारावर शिखर धवनला कोर्टाकडून घटस्फोट मंजूर

वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्ड

एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात 10 सामने खेळले गेले आहेत. (ENG vs NZ Head to Head in World Cup).

यामध्ये न्यूझीलंड संघाने ५ सामने जिंकण्यात यश मिळवले आहे. तर इंग्लंड 4 सामने जिंकले आहे.

दोन्ही संघ आतापर्यंत भारतात फक्त एकदाच आमनेसामने आले असून यामध्ये इंग्लंडने विजय मिळवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com