Yashasvi Jaiswal & Rachin Ravindra 
क्रीडा

NZ Vs SA: रचिन रवींद्रच्या द्विशतकाने मोडले अनेक रेकॉर्ड; यशस्वी जयस्वाललाही सोडले मागे

New Zealand vs South Africa Test: दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात माउंट माउंगानुई येथे खेळला जात आहे.

Manish Jadhav

New Zealand vs South Africa Test: दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात माउंट माउंगानुई येथे खेळला जात आहे. तर यजमान संघाने पहिल्या डावात पाहुण्या संघावर वर्चस्व राखले आहे.

एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये आपली छाप पाडणारा युवा फलंदाज रचिन रवींद्रने पहिल्या डावातच द्विशतक झळकावले. कारकिर्दीतील चौथा सामना खेळत असलेल्या रचिनने 366 चेंडूत 240 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. रचिन रवींद्रच्या या दमदार खेळीमुळे न्यूझीलंडला पहिल्या डावात 511 धावा करता आल्या. तसेच, रचिन रवींद्रच्या या द्विशतकानंतर त्याने अनेक विक्रमही आपल्या नावावर केले.

केन विल्यमसनच्या या रेकॉर्डला मागे टाकले

डावखुरा फलंदाज रचिन रवींद्र चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात आला. त्याने केन विल्यमसनसोबत 232 धावांची मोठी भागीदारीही केली. रचिन कसोटीत द्विशतक झळकावणारा न्यूझीलंडचा दुसरा सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. याआधी केन विल्यमसन दुसऱ्या स्थानावर होता.

दरम्यान, न्यूझीलंडसाठी कसोटीत सर्वात कमी वयात द्विशतक झळकावण्याचा विक्रम मॅथ्यू सिंक्लेअरच्या नावावर आहे.सिंक्लेअरने 1999 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात द्विशतक झळकावले होते. मॅथ्यू सिंक्लेअरने वेस्ट इंडिजविरुद्ध 214 धावा केल्या होत्या. आपल्या पहिल्या कसोटी शतकाचे दुहेरी शतकात रुपांतर करणारा रचिन हा न्यूझीलंडचा चौथा फलंदाज आहे. तसेच, पहिल्या कसोटी शतकात सर्वाधिक 240 धावा केल्यानंतर रचिन रवींद्र आता न्यूझीलंडचा पहिला फलंदाज बनला आहे. ज्याने पहिल्या कसोटीत सर्वात मोठी खेळी खेळली आहे.

यशस्वी जयस्वालही मागे सोडले

भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात यशस्वी जयस्वालने 209 धावांची उत्कृष्ट खेळी केली. त्यानंतर 2023-25 ​​ची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनमध्ये यशस्वी जयस्वालच्या नावावर सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम झाला होता. पण आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 240 धावा केल्यानंतर हा विक्रम रचिन रवींद्रच्या नावावर झाला आहे. रचिन रवींद्र 2023-25 ​​वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारा फलंदाज बनला आहे.

सचिन-द्रविडच्या नावावरुन नाव ठेवले

न्यूझीलंडचा 24 वर्षीय युवा फलंदाज रचिन द्रविड हा भारतीय वंशाचा आहे. रचिन रवींद्रचा जन्म न्यूझीलंडमध्ये झाला असला तरी. त्याच्या नावामागे एक कहाणी आहे. खरे तर, त्याचे वडील सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडचे चाहते होते. त्यानंतर त्यांनी राहुल द्रविडच्या नावावरुन 'रा' आणि सचिन तेंडुलकरच्या नावावरुन 'चिन' घेऊन 'रचिन' हे नाव तयार केले. यावर्षी आयपीएल 2024 मध्ये रचिन रवींद्र धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT