Shaheen Afridi & Haris Rauf  Dainik Gomantak
क्रीडा

PAK vs NZ: शाहीन आफ्रिदी आणि हारिस राऊफ यांच्या नावावर लाजिरवाणा रेकॉर्ड!

World Cup 2023: या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

Manish Jadhav

World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 चा 35 वा सामना न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात बंगळुरुमध्ये खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

पहिल्यांदा फलंदाजी करताना किवी संघाने 401 धावांची मोठी धावसंख्या उभारली आणि एकदिवसीय विश्वचषकात इतिहास रचला. यादरम्यान न्यूझीलंडच्या फलंदाजांनी पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. हारिस राऊफ आणि शाहीन शाह आफ्रिदी यांनी लाजिरवाणा विक्रम केला.

न्यूझीलंडच्या फलंदाजांनी शाहीन आफ्रिदी आणि हारिस राऊफ जोडीचा समाचार घेतला

दरम्यान, या सामन्यात शाहीन शाहने 10 षटकात 90 धावा दिल्या. तर हारिस राऊफने 10 षटकात 85 धावा दिल्या. हे दोघेही पाकिस्तानसाठी (Pakistan) विश्वचषकातील एका डावात सर्वाधिक धावा देणारे खेळाडू ठरले आहेत. तर शाहीनला या डावात एकही विकेट मिळाली नाही. 24 एकदिवसीय डावात त्याला एकही विकेट घेता आली नसल्याची ही पहिलीच वेळ आहे.

पाकिस्तानसाठी वर्ल्ड कपमधील सर्वात लाजिरवाणे स्पेल

0/90 – शाहीन आफ्रिदी विरुद्ध न्यूझीलंड, बंगळुरु (2023)

1/85 – हारिस राऊफ विरुद्ध न्यूझीलंड, बंगळुरु (2023)

1/84 – हसन अली विरुद्ध IND, मँचेस्टर (2019)

3/83 – हारिस राऊफ विरुद्ध AUS, बंगळुरु (2023)

न्यूझीलंडने इतिहास रचला

एवढेच नाही तर या डावात न्यूझीलंडने विश्वचषकाच्या (World Cup) इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्याही केली आहे. न्यूझीलंडची वनडे क्रिकेटमधील ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या होती. याआधी किवी संघाने 2008 मध्ये आयर्लंडविरुद्ध 402 धावा केल्या होत्या.

न्यूझीलंडनेही विश्वचषकात प्रथमच 400 धावांचा आकडा गाठला आहे. ही कामगिरी करणाऱ्या संघांमध्ये किवी संघाने प्रत्येकी एकदा अशी कामगिरी करणाऱ्या भारत आणि ऑस्ट्रेलियाची बरोबरी केली आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेने ही कमाल 3 वेळा केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Robbery Incident: सराफा दुकानाचे शटर फोडले, सीसीटीव्हीवर स्प्रे मारला, पण पोलिसांच्या 'सतर्कते'मुळे चोरट्यांचा चोरीचा डाव फसला; चावडी बाजारात मध्‍यरात्री थरार!

Horoscope: नवीन संधी येऊ शकते, महत्त्वाच्या निर्णयात संयम हवा! वाचा तुमच्या राशीचे भविष्य

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

Goa ZP Election 2025: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 'आप-आरजीपी' युतीचे संकेत; मनोज परब म्हणाले, 'सर्व पर्याय खुले'!

T20 World Cup 2026: रोहित शर्मा बनला टी20 वर्ल्ड कप 2026 चा 'ब्रँड ॲम्बेसेडर'; जय शहांची मोठी घोषणा!

SCROLL FOR NEXT