Messi and Mbappe are among the nominees for the 2022 Fifa Best Awards. Dainik Gomantak
क्रीडा

FIFA Awards साठी नामांकनं जाहीर; मेस्सी-एमबाप्पेसह 'या' खेळाडूंचा समावेश, मात्र रोनाल्डोला जागा नाही

फिफा पुरस्कार 2022 साठी नामांकने जाहीर झाली आहेत.

Pranali Kodre

FIFA Best Awards: फिफाने गुरुवारी 2022 वर्षातील पुरस्कारांसाठी नामांकने जाहीर केली आहेत. या नामांकनांमध्ये फिफा वर्ल्डकप 2022 गाजवलेल्या लिओनल मेस्सी आणि कायलिन एमबाप्पे यांचाही समावेश आहे.

मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने फिफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेचे विजेतेपद जिंकले होते. या स्पर्धेत मेस्सीने एकूण 7 गोल केले. त्याने फ्रान्सविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात महत्त्वपूर्ण दोन गोलची नोंद केली होती. त्यामुळे त्याला या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणूनही गौरविण्यात आले होते.

(Messi and Mbappe are among the nominees for the 2022 Fifa Best Awards.)

तसेच एमबाप्पे देखील फिफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेत दमदार कामगिरीने चर्चेत आला होता. त्याने या स्पर्धेत सर्वाधिक 8 गोल करत गोल्डन बूट आपल्या नावे केला होता. त्याने अर्जेंटिनाविरुद्ध फ्रान्सकडून अंतिम सामन्यात गोलची हॅट्रिकही नोंदवली होती. मात्र, तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.

दरम्यान, मेस्सी आणि एमबाप्पे क्लब फुटबॉल पॅरिस सेंट-जर्मेन संघाकडून एकत्र खेळतात. याच संघातील त्यांचे संघसहकारी नेमार आणि अश्रफ हाकिमी यांनाही फिफाकडून 2022 वर्षातील सर्वोत्तम पुरुष पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.

याबरोबरच सर्वोत्तम पुरुष फुटबॉलपटू पुरस्कारासाठीच्या नामांकन यादीत गेल्यावर्षीचा बॅनल डी'ओर पुरस्कार विजेता करिम बेंझेमा याचाही समावेश आहे. तसेच रोबर्ट लेवान्दोस्की, ज्युलियन अल्वारेज, केविन डी ब्रुयन, एर्लिंग हालंड, लुका मॉड्रिक आणि विनिसियस ज्यूनियर, मोहम्मद सालाह, सादिओ माने आणि ज्युड बेलिंगघम यांचाही या यादीत समावेश आहे.

तसेच सर्वोत्तम महिला फुटबॉलपटू पुरस्कारासाठी गेल्या सहा महिन्यापासून दुखापतीमुळे मैदानाबाहेर असलेली ऍलेक्सिया पुटेलास हिलाही नामांकन मिळाले आहे. तसेच बेथ मिड, लेह विलियम्सन आणि केइरा वॉल्श यांचाही नामांकन यादीत समावेश आहे.

सर्वोत्तम खेळाडूशिवाय सर्वोत्तम प्रशिक्षक आणि गोलरक्षक पुरस्कारांसाठीही नामांकन जाहीर झाले आहेत. या पुरस्कारांसाठी 3 फेब्रुवारीपर्यंत लोकांना मत देता येणार आहे. या मतांमधून प्रत्येक यादीतील अव्वल तीन जणांची निवड होईल. त्यानंतर राष्ट्रीय प्रशिक्षक, कर्णधार, पत्रकार आणि चाहते यांचा समावेश असलेली ज्यूरी सदस्य विजेता ठरवण्यासाठी मतदान करतील.

फिफाकडून पुरस्कारांसाठी नामांकन मिळालेले सदस्य -

सर्वोत्तम पुरुष खेळाडू - ज्युलियन अल्वारेज, ज्युड बेलिंगघम, करिम बेंझेमा, अश्रफ हाकिमी, रोबर्ट लेवान्दोस्की, केविन डी ब्रुयन, एर्लिंग हालंड, लुका मॉड्रिक, विनिसियस ज्यूनियर, मोहम्मद सालाह, सादिओ माने, कायलिन एमबाप्पे, लिओनल मेस्सी, नेमार.

सर्वोत्तम महिला खेळाडू - ऐटाना बोनमती, डेबिना, जेस्सी फ्लेमिंग, एडा हेबरबर्ग, सॅम केर, बेथ मिड, विविएन मिडेमा, ऍलेक्स मॉर्गन, लिना ओबेरडॉर्फ, ऍलेक्झेंड्रा पोप, ऍलेक्सिओ पुटेलास, वेंडी रेनार्ड, केइरा वॉल्श, लेह विलियम्सन.

सर्वोत्तम पुरुष प्रशिक्षक - कार्लो एन्सेलोटी, डिडिएर डेसचॅम्प्स, पेप गार्डिओला, वालिद रेग्रागुई, लिओनेल स्कॅलोनी.

सर्वोत्तम महिला प्रशिक्षक - सोनिया बोम्पास्टर, एमा हाईस, बेव प्रिस्टमॅन, पिया सुंधगे, मार्टिना वॉस, सारिना विगमन.

सर्वोत्तम पुरुष गोलरक्षक - एलिसन बेकर, यासिन बोनौ, थाबौच कोर्टियस, एडरसन, एमिलियानो मार्टिनेझ.

सर्वोत्तम महिला गोलरक्षक - एन-काट्रिन बर्गर, मेरी एर्प्स, ख्रिस्तिएन एन्डलर, मर्ली नेहर, सांड्रा पानोस गार्सिया-विलामिल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Goa News Live Updates: पर्ये मॅनेजमेंट कॉलेज जवळ रात्री चाकू हल्ला

SCROLL FOR NEXT