Football
Football Dainik Gomantak

FIFA World Cup: फिफा स्पर्धेच्या उद्‌घाटन खर्चातही मोठा घोटाळा

निविदा न काढताच हा इव्हेंट करण्यात आला. त्‍यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी आणि तोपर्यंत कुठलेही बिल फेडण्यात येऊ नये, असे गोवा फॉरवर्ड नेत्यांचे म्हणणे आहे.
Published on

Goa: कला अकादमीच्या नूतनीकरण खर्चात मोठ्या प्रमाणावर भ्रष्‍टाचार झाल्याचा आरोप करणाऱ्या गोवा फॉरवर्ड पक्षाने आता 17 वर्षांखालील मुलींच्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या इव्हेंट मॅनेजमेंटसाठी झालेल्‍या खर्चावर प्रश्‍‍नचिन्‍ह उपस्‍थित केले आहे.

या सोहळ्‍यावर जो 3.40 कोटींचा खर्च करण्‍यात आला, त्‍यास गोवा क्रीडा प्राधिकरणाकडून मंजुरी घेतली नसल्‍याचे उघड केले असून त्यासाठी पुरावा म्हणून सरकारी फाईलमधील ‘नोट’ व्हायरल केला आहे.

‘साग’ने जो नोट तयार केला आहे, त्यात आधी या कामाचा आदेश निघाला नव्हता. मात्र या कामाला कार्यकारी संचालकांची तोंडी मान्यता घेतली होती व मागाहून खर्चाची फाईल खात्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आली आहे असे म्हटले आहे.

Football
Mahadayi River: म्हादईचे वास्तव पाहण्यासाठी गेलेल्या ‘आप’च्‍या नेत्‍यांना कर्नाटक अधिकाऱ्यांनी रोखले कारण...

फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या इव्हेंट मॅनेजमेंटसाठी 3.40 कोटींचा खर्च म्हणजे मोठा घोटाळा असून वादग्रस्त माजी अधीक्षक तथा अभियंते रंगराजू यांना पुढे काढून तो करण्‍यात आला आहे. निविदा न काढताच हा इव्हेंट करण्यात आला. त्‍यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी आणि तोपर्यंत कुठलेही बिल फेडण्यात येऊ नये. -विकास भगत, गोवा फॉरवर्डचे नेते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com