17 Women's Football World Cup Dainik Gomantak
क्रीडा

U-17 WC: विजयामुळे नायजेरियाचे आव्हान कायम

17 वर्षांखालील महिला विश्वकरंडक स्पर्धेत न्यूझीलंडचा सलग दुसरा पराभव

दैनिक गोमन्तक

पणजी: नायजेरियाने न्यूझीलंडवर 4-0 फरकाने दणदणीत विजय नोंदवत फिफा 17 वर्षांखालील महिला विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले. त्यांचा हा ‘ब’ गटातील पहिला विजय ठरला, तर किवींना सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला, त्यामुळे त्यांचे परतीचे तिकीट निश्चित झाले.

(Nigeria team 1st victory in the Under 17 Women's Football World Cup tournament )

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर शुक्रवारी झालेल्या लढतीत नायजेरियाने पूर्वार्धात दोन गोलची आघाडी घेतली होती. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात आघाडी घेऊनही नायजेरियास जर्मनीकडून पराभव पत्करावा लागला होता, मात्र यावेळी त्यांनी प्रतिस्पर्धी संघाला डोके वर काढण्याची संधी दिली नाही. 16व्या मिनिटास आघाडी फळीतील अमिना बेलो हिने गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडली. नंतर 34 व्या मिनिटास मिरॅकल उसानी हिने संघाची आघाडी भक्कम केली. मिरॅकलचा हा स्पर्धेतील दुसरा गोल ठरला.

सामन्याच्या शेवटच्या 15 मिनिटांच्या खेळात नायजेरियाच्या खात्यात आणखी दोन गोलची भर पडली. तैवो अफोलाबी 75 व्या मिनिटास संघाची आघाडी 3-0 अशी वाढवल्यानंतर इंज्युरी टाईममध्ये 90+ 5 व्या मिनिटास बदली खेळाडू एदिदिओंग एतिम हिने ‘सुपर ईगल्स’च्या विजयावर शिक्कामोर्तब करणारा गोल नोंदविला. दोन सामने खेळल्यानंतर नायजेरियाचे आता तीन गुण झाले आहेत.

स्पर्धेतील पहिल्या सामन्यात चिलीविरुद्ध पराभव पत्करलेल्या न्यूझीलंडचा गटसाखळीतील शेवटचा सामना येत्या सोमवारी (ता. 17) रोजी जर्मनीविरुद्ध फातोर्डा येथे होईल. सोमवारीच नायजेरिया आणि चिली यांच्यातील शेवटचा साखळी सामना भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर खेळला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Post Truth Politics In India: इव्हीएम, 'एसआयआर' अन् निवडणूक आयोग... विरोधकांकडून तीन प्रमुख मुद्द्यांवरून खोटा प्रचार?

ज्ञानेश कुमारांच्या कार्यकाळात निवडणूक आयोगाची प्रतिमा काळवंडली, विरोधकांवर उलटणार डाव; मोदी सरकार करणार 'खेला'

संपादकीय: ‘ते’ आले अन् गेले!

Rahul Gandhi Goa Speech: 'गोवा बनले भ्रष्टाचाराचे केंद्र', राहुल गांधींचा भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल; खाणकाम, जमीन आणि बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर

Mhadei River Dispute: म्हादईप्रश्नी राहुल गांधींचे मौन! गोव्याच्या हिताला डावलून कर्नाटकाची पाठराखण केल्याचा गोमंतकीयांचा आरोप; राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा

SCROLL FOR NEXT