Senior Womens T-20: दोन पराभवानंतर अखेर गोव्याच्या महिला विजयी

जम्मू-काश्मीरवर 28 धावांनी मात; जम्मूच्या रुबिया सय्यदची नाबाद अर्धशतकी खेळी
Goan Player Sanjula Naik
Goan Player Sanjula Naik Dainik Gomantak
Published on
Updated on

(Senior Womens T-20) पणजी: सीनियर महिला टी-20 क्रिकेट स्पर्धेत सुरवातीचे दोन्ही सामने गमावल्यानंतर गोव्याने अखेर शुक्रवारी विजयाची चव चाखली. त्यांनी जम्मू-काश्मीरवर 28 धावांनी मात केली. सामना आसाममधील अमिनगाव क्रिकेट मैदानावर झाला.

Goan Player Sanjula Naik
T20 World Cup: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात या दिग्गजाचे स्थान निश्चित, भारत स्वबळावर जिंकणार!

गोव्याने या सामन्यात नव्या चेहऱ्यांना संधी दिली. त्यापैकी सलामीच्या इब्तिसाम शेख हिने संजुला नाईक हिच्यासह 45 धावांची भागीदारी करत गोव्याला चांगली पायाभरणी करून दिली. इब्तिसामने 22 धावा केल्या, तर डावात सर्वाधिक वैयक्तिक धावा संजुला नाईक हिने नोंदविल्या. तिने 40 चेंडूंत सहा चौकारांसह 38 धावा केल्या.

गोव्याने 6 बाद 123 धावा केल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या महिला संघाला 5 बाद 95 धावाच करता आल्या. कर्णधार शिखा पांडे हिने दोघींना बाद केले, तर स्पर्धेतील पहिलाच सामना खेळणाऱ्या सावली कोळंबकर व तनया नाईक यांनी प्रत्येकी एक विकेट मिळविली.

जम्मू-काश्मीरच्या रुबिया सय्यद हिने खिंड लढविताना शानदार अर्धशतक ठोकले. तिने 41 चेंडूंत 4 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 52 धावा केल्या. गोव्याचा स्पर्धेतील पुढील सामना रविवारी (ता. 16) गुजरातविरुद्ध होईल.

Goan Player Sanjula Naik
Kala Academy Row: फळे असलेल्या झाडावरच लोक दगड मारतात; मंत्री गोविंद गावडे

संक्षिप्त धावफलक

गोवा ः 20 षटकांत 6 बाद 123 (इब्तिसाम शेख 22, संजुला नाईक 38, शिखा पांडे 18, तेजस्विनी दुर्गड 9, विनवी गुरव नाबाद 17, निकिता मळीक 5, मेताली गवंडर 6, बिस्मा हसन 1-21, संध्या 1-15, नादिया चौधरी 1-23, रुबिया सय्यद 2-25) वि. वि. जम्मू-काश्मीर ः 20 षटकांत 5 बाद 95 (बुशरा अश्रफ 19, रुबिया सय्यद नाबाद 52, शिखा पांडे 4-0-13-2, निकिता मळीक 2-0-8-0, सुनंदा येत्रेकर 4-0-18-1, मेताली गवंडर 2-0-9-0, पूर्वा भाईडकर 2-0-19-0, सावली कोळंबकर 3-0-14-1, तनया नाईक 1-0-5-१, तेजस्विनी दुर्गड 1-0-10-0, संजुला नाईक 1-0-9-0).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com