T20 World Cup Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup: न्यूझीलंडचे उपांत्य फेरीच्या दिशेने एक पाऊल; श्रीलंकेवर 65 धावांनी विजय

श्रीलंकेचा डाव 102 धावांवर आटोपला.

गोमन्तक डिजिटल टीम

सिडनीच्या मैदानावर आज ग्रुप ए मधील न्यूझीलंड आणि श्रीलंका (New zeland And Srilanka) यांच्यात सामना झाला. न्युझीलंडने प्रथम फंलदाजी करत सात गडी गमावून 167 धावा केल्या. न्युझीलंडच्या ग्लेन फिलिप्सने 104 धावांची धडाकेबाज खेळी केली. 168 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या श्रीलंकेचा डाव 102 धावांवर आटोपला. न्युझीलंडने श्रीलंकेवर 65 धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरीतील स्थान जवळपास पक्के करण्याच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे.

श्रीलंका संघाची सुरूवात अतिशय खराब झाली. टीम साऊदी व ट्रेंट बोल्टने 3.3 षटकात केवळ 08 धावांवर श्रीलंकेचे चार फलंदाज बाद केले. 24 धावांपर्यंत श्रीलंकेचा अर्धा संघ बाद झालेला. यानंतर भानुका राजपक्षे याने काही मोठे फटके खेळत २२ चेंडूवर ३४ धावा काढल्या. मात्र, इतर फलंदाज फारसे योगदान देऊ शकले नाहीत. श्रीलंकेचा डाव 102 धावांवर संपवला. न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टने संघासाठी सर्वाधिक चार बळी घेतले.

तर, प्रथम फंलदाजी करताना न्यूझीलंड संघाचे 15 धावांत तीन बळी गेले होते. मात्र, त्यानंतर ग्लेन फिलिप्स आणि डॅरिल मिशेल यांनी चौथ्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारी केली. फिलिप्सनं 61 चेंडूत आपलं दुसरं टी-20 आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केलं. अखेरच्या षटकात 64 चेंडूत 104 धावा करून तो बाद झाला. त्यानं आपल्या खेळीत 10 चौकार आणि चार षटकार मारले. श्रीलंकेकडून कसून राजितानं सर्वाधिक दोन बळी घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कुणबी साडीवर दावा कुणाचा?

Porvorim Flyover: पर्वरी येथील उड्डाणपुलावर स्पीड कॅमेरे असतानाही उल्लंघन, 10 दिवसांत 580 वाहनांनी ओलांडली वेगमर्यादा

Kushavati Mock Drill: 'कुशावती'त चार ठिकाणी 'मॉक ड्रिल', आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात सराव; प्रशासन तपासणार यंत्रणांची सज्जता

GMC Resident Doctors: निवासी डॉक्टरांसाठी 'गार्ड'ची लढाई, स्टायपेंड वाढीसह 'गोमेकॉ'तील डॉक्टरांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा

Goa Housing Board: गृहनिर्माणकडून साखळी, थिवीत भूखंडांचा ई-लिलाव; निविदा जारी, 19 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची सूचना

SCROLL FOR NEXT