Ethanol Plant
Ethanol PlantDainik Gomantak

Ethanol Plant: 455 कोटींचा आशिया खंडातील सर्वात मोठा इथेनॉल प्लांट तयार, महागड्या इंधनापासून मिळणार दिलासा

या प्लांटमध्ये दररोज 350 किलोलिटर इथेनॉल तयार करण्याची क्षमता आहे
Published on

वाढत्या वायू प्रदूषण आणि पेट्रोल-डिझेलची वाढती महागाई यामुळे नागरिक त्रस्त आहेत. सरकार देखील जैवइंधन निर्मितीच्या क्षेत्रात वेगाने विकास करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून देशभरात विविध राज्यांमध्ये इथेनॉलचे प्लांट उभारले जात आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठा इथेनॉल प्लांट गोंडा, यूपी येथे तयार झाला आहे. या प्लांटमध्ये दररोज 350 किलोलिटर इथेनॉल तयार करण्याची क्षमता आहे, जी देशातील इतर प्लांटच्या तुलनेत सर्वाधिक आहे.

Ethanol Plant
Meditation संबंधित हे गैरसमज तुम्हाला माहिती आहेत का?

जगभरात इथेनॉल आधारित पेट्रोल आणि डिझेलची मागणी वाढत आहे. इथेनॉलच्या उत्पादन प्रक्रियेत पिकांचा किंवा अन्नाचा कचरा किंवा इतर गोष्टींचा वापर केला जातो, यामुळे वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होते. इथेनॉलच्या अनेक फायदे आहेत त्यामुळे, अनेक देश त्याच्या वापरावर वेगाने होत आहे. भारतात इथेनॉल प्लांट उभारणी वेगाने होत आहे. केंद्र सरकारने देशभरात सुमारे 199 प्लांट उभारण्यास मान्यता दिली आहे.

आशियातील सर्वात मोठा इथेनॉल प्लांट यूपीच्या गोंडा येथे बांधला जात आहे. 65 एकरांवर पसरलेल्या या प्लांटचे उद्घाटन योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते गेल्या वर्षी करण्यात आले होते. हा इथेनॉल प्लांट तयार करण्यासाठी सुमारे 455.84 कोटी रुपये खर्च आला आणि या प्लांटमध्ये दररोज 350 किलोलिटर पेक्षा जास्त इथेनॉल तयार करण्याची क्षमता आहे.

या प्लांटमुळे गोंडा लगतच्या जिल्ह्यांतील 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे, कारण या प्लांटसाठी दररोज 50 हजार क्विंटल उसाची गरज भासणार आहे.

Ethanol Plant
Cyber Intelligence Unit: महाराष्ट्रात होणार डेडिकेटेड सायबर इंटिलिजन्स युनिट

उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील इथेनॉल प्लांट पुढील महिन्यात ऑक्टोबर 2022 पासून सुरू होईल. येथे ऊस, ज्वारी, मका, बाजरी, धान, गहू आणि इतर प्रकारच्या बियांचा वापर करून इथेनॉल तयार केले जाईल. हा इथेनॉल प्लांट 25 एकरवर पसरला आहे. याशिवाय द्वारकेश साखर कारखान्यात देखील इथेनॉल प्लांटही तयार झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com