Kane Williamson, Tom Latham Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NZ, 1st ODI: भारताचा न्यूझीलंडकडून दारुण पराभव, लॅथम-विलियम्सनची द्विशतकी भागीदारी

पहिल्या वनडे सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून पराभवाचा धक्का बसला. न्यूझीलंडकडून लॅथम-विलियम्सन यांच्यात नाबाद द्विशतकी भागीदारी झाली.

दैनिक गोमन्तक डिजिटल

IND vs NZ, 1st ODI: न्यूझीलंड विरुद्ध भारत यांच्यात शुक्रवारी वनडे मालिकेतील पहिला सामना पार पडला. ऑकलंड येथे पार पडलेल्या सामन्यात न्यूझीलंडने 7 विकेट्सने विजय मिळवला. यासह त्यांनी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडसाठी कर्णधार केन विलियम्सन आणि टॉम लॅथम विजयाचे हिरो ठरले.

विलियम्सन-लॅथमची द्विशतकी भागीदारी

भारताने न्यूझीलंड समोर (India vs New Zealand) 307 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडने 47.1 षटकात 3 बाद 309 धावा करत सामना आपल्या नावावर केला. न्यूझीलंडकडून लॅथमने सर्वाधिक नाबाद 145 धावांची खेळी केली. त्याने 104 चेंडूत ही शतकी खेळी करताना 19 चौकार आणि 5 षटकार मारले.

तसेच त्याला कर्णधार विलियम्सनने (Kane Williamson) दमदार साथ देताना 98 चेंडूत 94 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 1 षटकार मारला. त्याचबरोबर लॅथम (Tom Latham) आणि विलियम्सन यांनी मिळून चौथ्या विकेटसाठी नाबाद 221 धावांची भागीदारीही रचली.

खरंतर 307 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. त्यांनी 20 षटकांच्या आत 88 धावांवरच 3 विकेट्स गमावल्या होत्या. पण त्याचवेळी विलियम्सन आणि लॅथम यांची जोडी जमली.

एकीकडे लॅथमने आक्रमक पवित्रा घेतलेला असताना दुसरी बाजू विलियम्सनने भक्कमपणे सांभाळून ठेवली. त्यामुळे नंतर त्यांनी भारतीय गोलंदाजांना एकही विकेट मिळू दिली नाही. पण त्याआधी भारताकडून उमरान मलिकने डेवॉन कॉनवे (24) आणि डॅरिल मिशेल (11) यांना बाद केले होते, तर शार्दुल ठाकूरने फिन ऍलेनची (22) विकेट घेतली होती.

भारताकडून तीन खेळाडूंचे अर्धशतक

तत्पूर्वी, सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 50 षटकांत 7 बाद 306 धावा धावफलकावर लावल्या. भारताकडून शिखर धवन आणि शुभमन गिल या सलामीवीरांनी 124 धावांची सलामी देत चांगली सुरुवात दिली. या दोघांनीही अर्धशतके झळकावली. शिखरने 72 आणि गिलने 50 धावांची खेळी केली.

तसेच मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) सर्वाधिक 80 धावांची खेळी केली. त्याने 76 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारासह ही खेळी केली. याशिवाय संजू सॅमसन (36) आणि वॉशिंग्टन सुंदर (37) यांनीही छोटेखानी महत्त्वपूर्ण खेळी केल्या.

त्यामुळे भारताने 300 धावांचा टप्पा ओलांडला. न्यूझीलंडकडून टीम साऊथी आणि लॉकी फर्ग्यूसन यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT