Team India Dainik Gomantak
क्रीडा

India vs New Zealand: उद्यापासून सुरू होणार थरार! जाणून घ्या दोन्ही संघ अन् संपूर्ण वेळापत्रक

न्यूझीलंडच्या भारत दौऱ्यातील सामन्यांना उद्यापासून सुरुवात होत आहे.

Pranali Kodre

India vs New Zealand: न्यूझीलंड क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर आला असून यजमानांविरुद्ध त्यांना तीन सामन्यांची वनडे आणि तीन सामन्यांची टी20 मालिका खेळायची आहे. या मालिकांना बुधवारपासून सुरुवात होणार आहे.

भारत आणि न्यूझीलंड संघात बुधवारपासून वनडे मालिका सुरू होईल. ही वनडे मालिका 24 जानेवारीला संपेल. त्यानंतर 27 जानेवारी रोजी टी20 मालिका सुरू होईल. टी20 मालिकेतील अखेरचा सामना 1 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

दरम्यान, वनडे मालिकेतील सर्व सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरू होणार आहेत, तर टी20 मालिकेतील सर्व सामने 7 वाजता सुरू होतील. हे सर्व सामने स्टार-स्पोर्ट्स चॅनेलवर प्रदर्शित होणार आहेत.

असे आहे न्यूझीलंडच्या भारत दौऱ्याचे वेळापत्रक

वनडे मालिका

18 जानेवारी - पहिला वनडे, हैदराबाद

21 जानेवारी - दुसरा वनडे, रायपूर

24 जानेवारी - तिसरा वनडे, इंदोर

आंतरराष्ट्रीय टी20 मालिका

27 जानेवारी - पहिला टी20 सामना, रांची

29 जानेवारी - दुसरा टी20 सामना, लखनऊ

1 फेब्रुवारी - तिसरा टी20 सामना, अहमदाबाद

भारत-न्यूझीलंड संघ -

वनडे मालिकेसाठी भारतीय संघ -

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ईशान किशन (यष्टीरक्षक), विराट कोहली, रजत पाटीदार, सूर्यकुमार यादव, केएस भरत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक.

टी20 मालिकेसाठी भारतीय संघ -

हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ईशान किशन (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ, मुकेश कुमार.

वनडे मालिकेसाठी न्यूझीलंड संघ -

फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार/यष्टीरक्षक), मायकेल ब्रेसवेल, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटनर, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर, जेकॉब डफी, डग ब्रेसवेल, मार्क चॅपमन, हेन्री शिपले.

टी20 मालिकेसाठी न्यूझीलंड संघ -

मिचेल सँटनर (कर्णधार), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेन क्लीव्हर, डेव्हॉन कॉनवे, जेकॉब डफी, लॉकी फर्ग्युसन, बेन लिस्टर, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मायकेल रिपॉन, हेन्री शिपले, ईश सोधी, ब्लेअर टिकनर.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Galjibaga Beach: गालजीबाग किनाऱ्याचे अस्तित्वच धोक्यात! अनेक वर्षांपासून सुरू असलेली धूप वाढली; वनखात्याचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा माजी नगरसेवकांचा आरोप

VIDEO: रोहित शर्मा वनडे वर्ल्ड कप खेळणार की नाही? 'हिटमॅन'च्या उत्तरानं चाहत्यांची धाकधूक वाढवली; पाहा व्हायरल व्हिडिओ!

Goa Agriculture: गोव्यात चारा टंचाईवर सरकारचा मोठा प्लॅन! लागवड क्षेत्राच्या 5 टक्के जमिनीवर चारा पिके; 10 हजार हेक्टरचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य

गुन्ह्यातील पीडितांना मिळणार आर्थिक आधार! गोवा सरकारची नवी 'पीडित भरपाई योजना २०२६' लागू; ॲसिड हल्ल्यात 5 लाखांपर्यंत मदत

Goa Weather: अखेर पणजीत पावसाचे अर्धशतक! राज्यात पावसाचा जोर मंदावला; वाळपईत सर्वाधिक 107 इंच, पणजीत सर्वात कमी 50 इंच

SCROLL FOR NEXT