Will Somerville  Dainik Gomantak
क्रीडा

New Zealand च्या 'या' क्रिकेटपटूने केली निवृत्तीची घोषणा, भारताविरुद्ध खेळला शेवटचा कसोटी सामना

New Zealand Cricket: न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. न्यूझीलंडने मालिका 2-0 ने जिंकली.

Manish Jadhav

New Zealand Cricket: न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. न्यूझीलंडने मालिका 2-0 ने जिंकली. पण याचदरम्यान न्यूझीलंडच्या एका अनुभवी खेळाडूने अचानक निवृत्ती जाहीर केली.

मात्र, हा खेळाडू सध्या खराब फॉर्ममुळे न्यूझीलंड संघातून बाहेर आहे. आम्ही बोलत आहोत, न्यूझीलंडचा ऑफस्पिनर विल सोमरविलेबद्दल.

पुढील महिन्यात देशांतर्गत हंगामाच्या शेवटी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे सोमरविलेने जाहीर केले आहे.

भारताविरुद्ध शेवटची कसोटी खेळली गेली

सोमरविलेने 2018 ते 2021 दरम्यान न्यूझीलंडसाठी सहा कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने एकूण 15 विकेट्स घेतल्या. त्याची सर्वोत्तम कामगिरी पाकिस्तानविरुद्ध झाली.

अबुधाबीमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या (Pakistan) पदार्पणाच्या कसोटी सामन्यात त्याने सात विकेट्स घेतल्या. त्याच्या या शानदार कामगिरीमुळे न्यूझीलंडने त्या सामन्यात पाकिस्तानचा 123 धावांनी पराभव केला.

डिसेंबर 2021 मध्ये त्याने वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे भारताविरुद्ध (India) शेवटची कसोटी खेळली. सोमरविलेला आता क्रिकेटमधून ब्रेक घ्यायचा आहे.

सोमारविलेची आंतरराष्ट्रीय कारकीर्द भलेही लहान असेल, पण त्याने आपली छाप नक्कीच सोडली आहे.

सोमरविले भावूक झाला

सोमरविलेने 2004/05 मध्ये ओटागोसाठी प्रथम श्रेणी पदार्पण केले. तो 1 ते 4 एप्रिल दरम्यान नेल्सनमधील सेंट्रल स्टॅग्सविरुद्ध शेवटचा सामना खेळणार आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 156 विकेट्स घेतल्या आहेत.

निवृत्तीची घोषणा केल्यानंतर सोमरविले म्हणाला की, 'वयाच्या 30 व्या वर्षी प्रोफेशनल क्रिकेटर बनल्यानंतर मी जो विचार केला होता, त्यापेक्षा जास्त मी साध्य केले.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

चार्जिंगचे टेन्शन कायमचे संपले! Redmi ने भारतात लॉन्च केले 10,000mAh बॅटरीचे 2 तगडे फोन; जाणून घ्या बजेटमधील किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Robotic Surgery: कमी वेदना, जलद रिकव्हरी! रोबोटिक सर्जरी म्हणजे काय? नॉर्मल ऑपरेशनपेक्षा किती वेगळी? जाणून घ्या वैद्यकीय तज्ज्ञांकडून

SCROLL FOR NEXT