New Zealand vs England: एमएस धोनीला बॅटिंगमध्ये भारी पडला किवी गोलंदाज, मोडलाय 'हा' मोठा रेकॉर्ड

न्यूझीलंडच्या दिग्गज गोलंदाजाने एमएस धोनीचा फलंदाजीमधील मोठा विक्रम मोडला आहे.
MS Dhoni | Tim Southee
MS Dhoni | Tim SoutheeDainik Gomantak

New Zealand vs England: न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड संघात सध्या वेलिंग्टन येथे दुसरा कसोटी सामना 24 फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे. या सामन्यात न्यूझीलंडकडून पहिल्या डावात कर्णधार टीम साऊथीने अर्धशतकी खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या मोठ्या विक्रमाला मागे टाकले आहे.

या सामन्यात त्याने आक्रमक खेळी करताना 49 चेंडूत 73 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने 5 चौकार आणि 6 षटकार मारले. त्यामुळे तो आता कसोटी क्रिकेटमध्ये 80 किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत आला आहे.

MS Dhoni | Tim Southee
Harry Brook: 145 वर्षांच्या कसोटी इतिहासात 'हा' रेकॉर्ड करणारा ब्रुक पहिलाच, भारताच्या कांबळीलाही पछाडलं

साऊथीचे आता कसोटी क्रिकेटमध्ये 92 सामन्यांत 82 षटकार झाले आहेत. तो सध्या कसोटीत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत अँड्र्यू फ्लिंटॉफ आणि मॅथ्यू हेडन यांच्यासह संयुक्तरित्या 10 व्या क्रमांकावर आहे.

विशेष म्हणजे त्याने या यादीत एमएस धोनी, केविन पीटरसन, मिसबाह उल हक सारख्या दिग्गजांनाही मागे टाकले आहे. धोनीने कसोटीत 78 षटकार मारले आहेत. तसेच पीटरसन आणि मिसबाह यांनी प्रत्येकी 81 षटकार मारले आहेत.

MS Dhoni | Tim Southee
Team India वर बसतोय 'चोकर्स'चा शिक्का! गेल्या दहा वर्षातील तब्बल 15 ICC स्पर्धाच आहेत पुरावा

दरम्यान, साऊथीच्या अर्धशतकामुळे न्यूझीलंडला पहिल्या डावात सर्वबाद 209 धावा करता आल्या. पण तरीही ते 226 धावांनी पिछाडीवर असल्याने इंग्लंडने त्यांना फॉलोऑन दिला आहे. इंग्लंडने पहिला डाव 8 बाद 435 धावांवर घोषित केला होता.

इंग्लंडकडून पहिल्या डावात हॅरी ब्रुकने 176 चेंडूत 186 धावा केल्या होत्या. तसेच जो रुटने 224 चेंडूत 153 धावा केल्या होत्या. या डावात न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या होत्या.

दरम्यान, फॉलोऑन नंतर दुसऱ्या डावात न्यूझीलंडने तिसऱ्या दिवसाखेर 83 षटकात 3 बाद 202 धावा केल्या आहेत. अद्याप ते 24 धावांनी पिछाडीवर आहेत. दुसऱ्या डावात टॉम लॅथमने 83 धावांची आणि डेवॉन कॉनवेने 61 धावांची अर्धशतकी खेळी केली आहे. तसेच तिसऱ्या दिवसाखेर केन विलियम्सन 25 आणि हेन्री निकोल्स 18 धावांवर नाबाद आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com