Michael Bracewell | Kane Williamson Dainik Gomantak
क्रीडा

न्यूझीलंडला तगडा झटका! World Cup 2023 मधून स्टार ऑलराऊंडर बाहेर, कॅप्टन विलियम्सनवरही प्रश्नचिन्ह

भारतात होणाऱ्या वर्ल्डकप 2023 स्पर्धेतून न्यूझीलंडचा स्टार ऑलराऊंडर दुखापतीमुळे बाहेर झाला आहे.

Pranali Kodre

Michael Bracewell will miss Cricket World Cup 2023: भारतात यावर्षी 13 वा वनडे वर्ल्डकप खेळवण्यात येणार आहे. हा वर्ल्डकप ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे. पण या वर्ल्डकपपूर्वी न्यूझीलंड क्रिकेट संघाला तगडा झटका बसला आहे.

या वर्ल्डकपमधून न्यूझीलडंचा स्टार अष्टपैलू मायकल ब्रेसवेल बाहेर झाला आहे. इंग्लंडमध्ये देशांतर्गत टी20 स्पर्धेत खेळत असताना त्याच्या उजव्या टाचेच्या वरच्या भागात गंभीर दुखापत झाली आहे. शुक्रवारी वूस्टरशायरकडून यॉर्कशायरविरुद्ध खेळताना ब्रेसवेल फलंदाजी करत असताना त्याला ही दुखापत झाली. त्याला या सामन्यात 11 धावांवर रिटायर्ड हर्टही व्हावे लागले.

त्यानंतर 32 वर्षीय ब्रेसवेलची इंग्लंडमध्येच गुरुवारी शस्त्रक्रिया होणार आहे. त्यानंतर त्याला या दुखापतीतून पूर्ण सावरण्यासाठी 6 ते 8 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्याचमुळे त्याला वर्ल्डकपमधून बाहेर व्हावे लागले आहे.

त्याच्या दुखापतीबद्दल न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टेड म्हणाले, 'पहिल्यांदा तर तुम्हाला त्या खेळाडूबद्दल वाईट वाटते ज्याला दुखापत झाली आहे आणि विशेषत: जेव्हा त्याला त्यामुळे वर्ल्डकपसारख्या स्पर्धेला मुकावे लागणार आहे.'

'मायकल संघाचा चांगला खेळाडू आहे आणि त्याने आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यापासून गेल्या १५ महिन्यात न्यूझीलंडसाठी चांगली कामगिरी केली आहे. आपण त्याची तिन्ही क्षेत्रात कौशल्य पाहिले आहे. तो भारतात होणाऱ्या वर्ल्डकपसाठी आमचा महत्त्वाचा खेळाडू होता.'

'मायकले नक्कीच निराश असेल, पण हे समजून घेणेही गरजेचे आहे की दुखापती हा खेळाचाच एक भाग आहेत आणि त्याला आता त्यातून सावण्यावर लक्ष द्यावे लागेल.'

दरम्यान मधल्या फळीतील चांगला फलंदाज असलेला ब्रेसवेल फिरकी गोलंदाजीही करत असल्याने तो भारताची फिरकी गोलंदाजीला पोषक खेळपट्ट्या लक्षात घेता तो न्यूझीलंडसाठी महत्त्वाचा खेळाडू होता.

विलियम्सनही बाहेर होण्याची शक्यता

न्यूझीलंडचा वनडे कर्णधार केन विलियम्सन आयपीएल 2023 स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता. गुजरात टायटन्सकडून चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध क्षेत्ररक्षण करताना त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती, त्याच्याही गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली आहे.

त्यामुळे विलियम्सनही भारतात होणाऱ्या वर्ल्डकपला मुकण्याची शक्यता दाट आहे. त्याच्यावर एप्रिलमध्ये शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्याला त्यातून सावरण्यासाठी साधारण ६ महिन्यांचा कालावधी लागणार होता. त्यामुळे जरी अद्याप तो वर्ल्डकपमध्ये खेळणार की नाही, याबद्दल अंतिम निर्णय झालेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UTAA: गोविंद गावडे, वेळीप यांनी स्वार्थासाठी संघटनेचा वापर केला! शिरोडकरांचा हल्लाबोल; हुकूमशाही कारभाराचा आरोप

Goa Politics: खरी कुजबुज; साडेसहा कोटींच्या मंडपाचा शोध!

Pandharpur Wari: पावलो पंढरी वैकुंठ भुवनी! वैष्णवांचा मेळा डेरेदाखल, 15 लाख भाविकांची मांदियाळी

Babu Ajgaonkar: 'माझे कितीही पुतळे जाळा, मी 2027 ची निवडणूक लढवणारच'! बाबू आजगावकरांचा निर्धार

Anmod Ghat: अनमोड घाटाबाबत नवी अपडेट! अवजड वाहतुकीसाठी रस्ता राहणार बंद; 'या' वाहनांना मिळणार सूट

SCROLL FOR NEXT