Neil Brand  Dainik Gomantak
क्रीडा

NZ Vs SA: कारकिर्दीतील पहिल्याच कसोटीत 'या' खेळाडूची शानदार कामगिरी; 24 वर्ष जुना विक्रम मोडला!

South Africa vs New Zealand Test Match: दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना खेळला जात आहे.

Manish Jadhav

South Africa vs New Zealand Test Match: दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 511 धावा केल्या होत्या. रचिन रवींद्र आणि केन विल्यमसन यांनी संघासाठी उत्कृष्ट शतके झळकावली. दोन दिवसांचा खेळ संपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने चार गडी गमावून 80 धावा केल्या आहेत.

या खेळाडूने चमत्कार केला

दरम्यान, या सामन्यात नील ब्रँडने दक्षिण आफ्रिकेसाठी पदार्पण केले आहे. कर्णधार म्हणून तो पहिलाच सामना खेळला आहे. नीलने आपल्या कारकिर्दीतील पहिल्या कसोटी सामन्यात शानदार गोलंदाजी केली आणि संघासाठी सर्वात मोठा सामना विजेता म्हणून उदयास आला. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या डावात 26 षटकांत 119 धावांत 6 बळी घेतले होते. त्याने कर्णधार म्हणून पदार्पणाच्या कसोटीच्या एका डावात सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम केला आहे. यापूर्वी, हा विक्रम बांगलादेशच्या नैमूर रहमानच्या नावावर होता, जो त्याने 2000 मध्ये भारताविरुद्ध केला होता. तेव्हा नैमूरने 132 धावांत 6 विकेट घेतल्या होत्या, मात्र आता नील ब्रँडने 24 वर्षांनंतर हा विक्रम मोडला आहे.

नील ब्रँडची कारकीर्द

नील ब्रँडने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेसाठी 51 प्रथम श्रेणी सामन्यात 72 बळी घेतले आहेत. याशिवाय, त्याच्या नावावर 25 लिस्ट ए सामन्यात 22 विकेट आहेत. त्याने फर्स्ट क्लासमध्ये 2906 धावा केल्या आहेत, ज्यात 6 शतकांचा समावेश आहे. नील सध्या 27 वर्षांचा असून तो कर्णधार म्हणून पहिला कसोटी सामना खेळत आहे.

या दोन खेळाडूंनी शतके झळकावली

दरम्यान, पहिल्यांदा फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने 511 धावा केल्या होत्या. संघाकडून केन विल्यमसनने सर्वाधिक 118 धावा केल्या. तर रचिन रवींद्रने 240 धावांचे योगदान दिले. ग्लेन फिलिप्सने 39 धावा केल्या. या खेळाडूंमुळेच किवी संघाला मोठी धावसंख्या उभारता आली. रचिनने त्याच्या कारकिर्दीतील पहिले द्विशतक झळकावले आहे आणि 2023-25 ​​च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक खेळी करणारा खेळाडू बनला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: 'कॅश फॉर जॉब'; त्यांनी "क्लीन चीट" शब्द कुठेच वापरला नाही - मुख्यमंत्री स्पष्टच बोलले!

भाजपने IFFI आंतरराष्ट्रीय फ्रॉड फेस्टिव्हल केलाय, गोवन फिल्म विभागावरुन काँग्रेसने सरकारला विचारला मोठा सवाल

Goa Crime: गोव्यात आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा भांडाफोड; ओमानमध्ये नोकरीचे आमिष देऊन महिलांना फसवलं, 2 अटक

Maharashtra Election Holiday: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदानासाठी गोवा सरकारची भरपगारी सुट्टी; आदेश जारी

Mapusa: बेकायदा नोकरभरतीवरून म्‍हापसा पालिका बैठक तापली; 20 पैकी 11 नगरसेवकांचे ‘वॉक आऊट’

SCROLL FOR NEXT