Nehru Hockey Cup
Nehru Hockey Cup Dainik Gomantak
क्रीडा

Nehru Hockey Cup: दामोदर उच्च माध्यमिकला राज्य विजेतेपद

दैनिक गोमन्तक

पणजी: गुडी येथील दामोदर उच्च माध्यमिक विद्यालयाने अंतिम लढतीत पिलारच्या फादर आग्नेल उच्च माध्यमिक विद्यालयावर 4-0 फरकाने मात केली आणि नेहरू कप 17 वर्षांखालील मुलांच्या हॉकी स्पर्धेत राज्यस्तरीय विजेतेपद मिळविले. या कामगिरीने ते दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय पातळीवरील स्पर्धेसाठी गोव्याचे प्रतिनिधित्व करण्यास पात्र ठरले.

(Nehru Cup Hockey Damodar High School won the final match)

राज्यस्तरीय अंतिम सामना शुक्रवारी पेडे-म्हापसा येथील हॉकी मैदानावर झाला. विश्रांतीला दामोदर उच्च माध्यमिक संघ 2-0 फरकाने आघाडीवर होता. त्यांच्या विजयात जाफर मोमिन शेख याने शानदार हॅटट्रिक साधली. अन्य एक गोल क्रिश गावकर याने केला. दिल्ली येथील स्पर्धेसाठी विजयी संघ 31 ऑगस्ट रोजी रवाना होईल.

स्पर्धेतील मोहिमेत दामोदर उच्च माध्यमिक संघाने चांदर येथील सेंट जोसेफ हायस्कूलवर, म्हापसा येथील जनता हायस्कूलवर, तर उपांत्य लढतीत दामोदर इंग्लिश हायस्कूलवर मात केली होती. संघाला शारीरिक शिक्षण शिक्षक जयकृष्ण नाईक देसाई व प्रणव प्रभुदेसाई यांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेत तिसरा क्रमांक दामोदर इंग्लिश हायस्कूलला मिळाला. त्यांनी मोर्ले सरकारी विद्यालयावर टायब्रेकरद्वारे मात केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: पेडण्यात टॅक्सीचालकांनी आणले कोनाडकरांचे खून प्रकरण उघडकीस

Goa Police: 25 लाखांची सोन्याची बिस्किटे घेवून झाला फरार; पश्चिम बंगालमधून चोरट्याला अटक!

IndiGo Future Plan: इंडिगोचा मेगा प्लॅन, 100 छोटी विमाने ऑर्डर करण्याची एअरलाइन्सची तयारी

Dhargal Hit And Run Case: धारगळमध्ये तो अपघात नव्हे खूनच! उत्तर प्रदेशच्या दोघांना अटक

Lost From Beach: गोव्यात विविध बीचवरुन पाच मुले बेपत्ता; 'दृष्टी'ने घडवली कुटुंबियांशी पुन्हा भेट

SCROLL FOR NEXT