Chess tournament Dainik Gomantak
क्रीडा

Chess Tournament: नीरज सारिपल्ली ठरला चौसष्ट घरांचा राजा

इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात पार पडली स्पर्धा

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: अव्वल मानांकित नीरज सारिपल्ली याने लेफ्टनंट कमांडर गोपाळ सखाराम सुकठणकर स्मृती खुल्या रॅपिड मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद मिळविले. तर नीरज व मंदार लाड यांचे समान साडेआठ गुण झाल्याने टायब्रेकर गुणांत मंदारला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

(Neeraj Saripalli won the open rapid ranking chess tournament)

या स्पर्धेत साईराज वेर्णेकर याला तिसरा आला. नीरजचे हे सलग दुसरे रॅपिड बुद्धिबळ विजेतेपद ठरले. गतआठवड्यात त्याने बीपीएस मानांकन स्पर्धा जिंकली होती.

मुष्टिफंड पालक-शिक्षक संघटनेतर्फे तिसवाडी तालुका बुद्धिबळ संघटना, गोवा बुद्धिबळ अस्थायी समिती, अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ यांच्या मान्यतेने स्पर्धा पणजीतील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात झाली.

या स्पर्धेचे बक्षीस वितरण पणजी येथील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझाचे अध्यक्ष दशरथ परब, तिसवाडी तालुका बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष महेश कांदोळकर, गोवा बुद्धिबळ अस्थायी समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर नाईक, स्पर्धेचे मुख्य आर्बिटर अरविंद म्हामल, उपआर्बिटर दत्ताराम पिंगे, मुष्टिफंड हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अपर्णा च्यारी, स्पर्धा संचालक पल्लवी काकोडकर, गीतांजली किंवसारा, स्नेहा तामणकर, नंधिनी सारिपल्ली यांच्या उपस्थितीत पार पडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: गणेश मूर्ती तयार करण्याचे का पुढील ४-५ दिवसांत काम पूर्ण होण्याच्या मार्गावर

Goa: 'राज्यात घरे कायदेशीर करताना दंडही वसूल करणार', मुख्‍यमंत्र्यांनी दिली माहिती; सहकार्याचे कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांना आवाहन

Cristiano Ronaldo: रोनाल्डो 'गोव्यात' खेळणार की नाही? सुरक्षा यंत्रणा घेणार निर्णय; देशभरातील फुटबॉलप्रेमी आशावादी

Goa AAP: 'गोव्यात काँग्रेसने जनतेचा विश्‍वास गमावला'! आतिषी यांचे प्रतिपादन; आघाडी करणार नसल्याचा पुनरुच्चार

Goa Politics: खरी कुजबुज; फोंड्यात अशीही बनवाबनवी

SCROLL FOR NEXT