javelin Neeraj Chopra Silver Medal Dainik Gomantak
क्रीडा

VIDEO: 'मी नसलो तरी भारताकडे...', सिल्वर मेडल जिंकल्यानंतर नीरज चोप्राचं मोठं वक्तव्य; यशवीर सिंगच्या कामगिरीचं केलं कौतुक

Commonwealth Games 2026 javelin Neeraj Chopra Silver Medal: भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रा याने कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये दमदार कामगिरी करत रौप्यपदकाची कमाई केली.

Sameer Amunekar

भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रा याने कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये दमदार कामगिरी करत रौप्यपदकाची कमाई केली. दुखापतीनंतर पुनरागमन करत त्याने पुन्हा एकदा आपल्या सातत्यपूर्ण खेळाची छाप सोडली. या यशासह नीरज कॉमनवेल्थ गेम्सच्या इतिहासात भालाफेक स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य अशी दोन्ही पदके जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. पदक जिंकल्यानंतर नीरजने आपल्या पुनरागमनाबाबत समाधान व्यक्त करताना भारतीय भालाफेकपटूंच्या नव्या पिढीबद्दलही मोठा विश्वास व्यक्त केला.

'भारताकडे आता पदक जिंकणारे अनेक खेळाडू आहेत'

स्पर्धेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नीरज म्हणाला की, भारतीय भालाफेकीत आता उत्कृष्ट खेळाडू तयार होत आहेत. त्याने कांस्यपदक विजेता यशवीर सिंग याचे विशेष कौतुक करत सांगितले की, मोठ्या स्पर्धेत वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करणे ही मोठी उपलब्धी आहे.

त्याच्या मते, जर तो स्वतः मैदानात नसला किंवा दुखापतीमुळे खेळू शकला नाही, तरी भारताकडे पदक जिंकण्याची क्षमता असलेले अनेक भालाफेकपटू आहेत. यशवीरने 85 मीटरचा टप्पा गाठला असून रोहित यादवही सातत्याने चांगली कामगिरी करत असल्याचे त्याने नमूद केले.

पुनरागमन योग्य दिशेने

नीरजने सांगितले की, या हंगामातील ही त्याची सर्वोत्तम कामगिरी असून दुखापतीनंतरचे पुनरागमन योग्य दिशेने सुरू आहे. आगामी मोठ्या स्पर्धांसाठी तो अधिक तयारी करणार असल्याचेही त्याने स्पष्ट केले.

त्याने याआधीच्या मोठ्या स्पर्धेतील आठवणींनाही उजाळा देत भारतीय खेळाडूंनी एकत्र पोडियमवर उभे राहण्याचा आनंद वेगळाच असल्याचे सांगितले.

थंड हवामानामुळे अडचण

स्पर्धेतील आपल्या कामगिरीबाबत बोलताना नीरजने मान्य केले की, अंतिम फेरीत त्याचा एकच थ्रो अपेक्षेप्रमाणे झाला. ग्लासगोमधील थंड हवामानामुळे सर्वोत्तम कामगिरी करण्यात अडचणी आल्याचे त्याने सांगितले. त्याला उबदार वातावरणात खेळणे अधिक सोयीचे वाटते, असेही तो म्हणाला.

पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून नीरज चोप्रा आणि कांस्यपदक विजेता यशवीर सिंह या दोघांचे अभिनंदन केले. नीरजच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे आणि जिद्दीचे कौतुक करत त्यांनी त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

याशिवाय, यशवीर सिंहच्या उत्कृष्ट कामगिरीचेही कौतुक करत त्याची ही कामगिरी देशातील युवा खेळाडूंना प्रेरणा देणारी असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.

पुढील लक्ष्य आशियाई क्रीडा स्पर्धा

कॉमनवेल्थ गेम्समधील यशानंतर आता नीरज चोप्राचे लक्ष आगामी आशियाई क्रीडा स्पर्धांकडे लागले आहे. सातत्यपूर्ण कामगिरी कायम ठेवत आणखी एक मोठे पदक जिंकण्याचा त्याचा प्रयत्न असणार असून भारतीय क्रीडाप्रेमींनाही त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

Ranji Trophy Cricket: घरच्या मैदानावर गोव्याची रणजी मोहीम सुरू; अनुभवी बडोद्याशी पहिल्यांदाच रणजी लढत

SCROLL FOR NEXT