Neeraj Chopra
Neeraj Chopra ANI/Twitter
क्रीडा

Neeraj Chopra: ऑलिम्पिक गोल्डन बॉय नीरज चोप्रा याची World Athletics Championshipsच्या अंतिम फेरीत धडक

दैनिक गोमन्तक

ऑलिम्पिक गोल्डन बॉय भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने यूजीन, यूएसए येथे सुरू असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये मोठी कामगिरी केली आहे. या चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत तो प्रथमच पात्र ठरला आहे. भारताचा स्टार भालाफेकपटू नीरजने पहिल्याच प्रयत्नात 88.39 मीटर भालाफेक करून पुरुषांच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केले.

या चॅम्पियनशिपमध्ये 24 वर्षीय नीरज चोप्रासोबत जगभरातील 34 भालाफेकपटूंचाही सहभाग होता.फायनल रविवारी (IST) होणार आहे.

पहिल्याच प्रयत्नात दमदार थ्रो
वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत खेळाडूंना दोन गटात ठेवण्यात आलं होतं. या दोन्ही गटातील सर्वोत्तम 12 खेळाडूंना अंतिम फेरीत स्थान मिळणार होतं. ऑटोमेटिक क्वालीफिकेशनसाठी 83.50 मीटर स्केल निश्चित करण्यात आलं होतं. नीरजनं पहिल्याच प्रयत्नात हा टप्पा पार करत अंतिम फेरीत प्रवेश केलाय. त्याला अ गटात स्थान देण्यात आले आहे.

* नीरज चोप्राचं जोरदार कमबॅक
नीरजनं 2017 मध्ये लंडन येथे खेळण्यात आलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या गट फेरीत 82.26 मीटर अंतर पार करू शकला. ज्यामुळं त्याला अंतिम फेरीत स्थान मिळालं नव्हतं. मात्र, त्यानंतर 2019 मध्ये दोहा येथे झालेल्या चॅम्पियनशिपमध्ये कोपराच्या शस्त्रक्रियेमुळं तो भाग घेऊ शकला नव्हता. पण त्यानंतर जोरादार कमबॅक करत अनेक विक्रम मोडले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women In Goa Startup: देशापेक्षा गोव्याची सरासरी अधिक; स्टार्टअपमध्ये महिलांचा डंका

Goa News : ‘आमुरचंवर’ लेखसंग्रह ठरेल भावी पिढीसाठी मार्गदर्शक: मिनाक्षी मार्टिन्स

Chhattisgarh Accident: मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये भीषण अपघात, पिकअपखाली चिरडून 18 मजुरांचा मृत्यू; 20 हून अधिक जखमी

Goa Today's Live News: आप बाणावलीची जिल्हा पंचायत निवडणूक लढणार - व्हेंझी

Viral Video: पट्ट्यानं अशी सर्जरी केली, तुम्हीही व्हिडिओ पाहून डोक्यावर माराल हात; म्हणाल, ‘’असला सनकी कधीच पाहिला नाही’’

SCROLL FOR NEXT